Thursday, November 13, 2025 01:48:55 PM

World Cup Trophy Tattoo: हरमनप्रीत कौरने हातावर काढला वर्ल्ड कप ट्रॉफीचा टॅटू; शेअर केली भावनिक पोस्ट

तिने भारताला 2025 महिला विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिलं. या ऐतिहासिक विजयाच्या आठवणी कायम जिवंत ठेवण्यासाठी हरमनप्रीतने आपल्या हातावर विश्वचषक ट्रॉफीचा टॅटू गोंदवला आहे.

world cup trophy tattoo हरमनप्रीत कौरने हातावर काढला वर्ल्ड कप ट्रॉफीचा टॅटू शेअर केली भावनिक पोस्ट

World Cup Trophy Tattoo: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा स्वप्नवत क्षण साकार केला आहे. तिने भारताला 2025 महिला विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिलं. या ऐतिहासिक विजयाच्या आठवणी कायम जिवंत ठेवण्यासाठी हरमनप्रीतने आपल्या हातावर विश्वचषक ट्रॉफीचा टॅटू गोंदवला आहे.

विजयानंतर अवघ्या तीन दिवसांत हरमनप्रीतने हा टॅटू काढला. तिने या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, 'हा विजय माझ्या त्वचेवर आणि माझ्या हृदयात कायमचा कोरला गेला आहे. मी पहिल्या दिवसापासून तुझी वाट पाहत होते आणि आता मी तुला दररोज पाहू शकते. हे विलक्षण आहे.' तिच्या या पोस्टने चाहत्यांच्या भावना भारावल्या असून तिच्या पोस्टवर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा -  Asia Cup Trophy: ट्रॉफीचोर नक्वीने काढला पळ! आशिया कप ट्रॉफीवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय आमने-सामने

भारताचा ऐतिहासिक विश्वचषक विजय

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात पराभूत करत पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकला. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतर हरमनप्रीतच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अंतिम सामन्यातील विजयाने तिचे स्वप्न साकार झाले. हा विजय भारताच्या महिला क्रिकेट इतिहासातील एक नवा अध्याय ठरला आहे. 

हेही वाचा - Virat Kohli Birthday : किंग कोहली 37 वर्षांचा झाला! अजूनही क्रिकेट विश्वाचा निर्विवाद बादशाह; असा आहे विराटचा दैदीप्यमान प्रवास

पाचव्या प्रयत्नात यश

हरमनप्रीत कौरने या आधी चार विश्वचषक मोहिमा खेळले होते. पण प्रत्येक वेळी संघ उपांत्य किंवा अंतिम फेरीतच थांबला होता. हरमनप्रीत कौर म्हणाली, 'आम्ही नेहमी शेवटपर्यंत झुंज दिली पण ट्रॉफी दूरच राहिली. यावेळी मात्र आम्ही ती जिंकली आणि हा क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही.' या विजयाचं स्मरण मनातच नव्हे तर अंगावरही कोरून ठेवत, हरमनप्रीतने दाखवून दिलं की भारतीय महिला क्रिकेट आता आत्मविश्वासाने आणि अभिमानाने उभं आहे.
 


सम्बन्धित सामग्री