Rising Stars Asia Cup: दोहा (कतार) येथे या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या एसीसी रायझिंग स्टार्स टी-20 स्पर्धेसाठी श्रीलंका अ संघ जाहीर करण्यात आला आहे. 22 वर्षीय डावखुरा फिरकीपटू दुनिथ वेलालागे याची संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल संघ
श्रीलंका अ संघात विजयकांत वियाशांत, सहान अराचिगे, मिलन रत्नायके, रमेश मेंडिस, नुवानिदु फर्नांडो, निशान मदुस्का आणि प्रमोद मदुशन यांसारखे तरुण आणि अनुभवी खेळाडू समाविष्ट आहेत. संघात स्थानिक पातळीवर चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक नवोदितांना संधी देण्यात आली आहे. वेलालागे, नुवानिदु आणि मदुशन यांना अलीकडच्या काळात श्रीलंकेच्या वरिष्ठ संघात खेळण्याची संधी मिळाली होती. तर, रत्नायकेने बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत, तर रमेश मेंडिसने फेब्रुवारी 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तथापी, 20 वर्षीय विशेन हलंबागे यालाही या स्पर्धेत संधी मिळाली असून, त्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - हार्दिक आणि माहिका यांच्यातली केमेस्ट्री.. दोघे मिळून कार धूत असल्याचा व्हिडिओ केला शेअर
स्पर्धेतील आव्हान आणि गटबांधणी
श्रीलंका अ संघाचा समावेश गट अ मध्ये करण्यात आला असून, या गटात अफगाणिस्तान अ, हाँगकाँग अ आणि बांगलादेश अ संघांचाही समावेश आहे. गट ब मध्ये भारत अ, पाकिस्तान अ, ओमान आणि यूएई हे संघ आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
हेही वाचा - India vs South Africa: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा; ऋषभ पंत आणि आकाशदीप संघात परतले
रायझिंग स्टार्स आशिया कप 2025 वेळापत्रक
14 नोव्हेंबर: ओमान vs पाकिस्तान, भारत vs यूएई
15 नोव्हेंबर: बांगलादेश vs हाँगकाँग, अफगाणिस्तान vs श्रीलंका
16 नोव्हेंबर: ओमान vs यूएई, भारत vs पाकिस्तान
17 नोव्हेंबर: हाँगकाँग vs श्रीलंका, अफगाणिस्तान vs बांगलादेश
18 नोव्हेंबर: पाकिस्तान vs यूएई, भारत vs ओमान
19 नोव्हेंबर: अफगाणिस्तान vs हाँगकाँग, बांगलादेश vs श्रीलंका
21 नोव्हेंबर: उपांत्य फेरी
23 नोव्हेंबर: अंतिम सामना
रायझिंग स्टार्स आशिया कपसाठी श्रीलंका अ संघ
दुनिथ वेलालागे (कर्णधार), विशेन हलंबागे, निशान मदुस्का (यष्टीरक्षक), नुवानिदु फर्नांडो, लसिथ क्रुस्पुले, रमेश मेंडिस, कविंदू डे लिवेरा, सहान अराचिगे, अहान विक्रमसिंघे, प्रमोद मदुशन, गरुका संकेथ, इसिथा विजेसुंदरा, मिलन रत्नायके, विजयकांत वियाशांत, ट्रेविन मॅथ्यू.