IND-W vs SA-W Final: महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली आहे. नवी मुंबईत खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात शेफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने भारतीय डावाची जबरदस्त सुरुवात केली. दोघींनी पहिल्या सहा षटकांत कोणताही विकेट न गमावता धावसंख्या 50 च्या पुढे नेली. शेफाली वर्माने फटकेबाजी करत मॅरिझॅन कॅपच्या गोलंदाजीवर सलग चौकार लगावले. तिने फक्त 15 चेंडूत 21 धावा केल्या आहेत, तर स्मृती मानधनाने तिची साथ देत 15 चेंडूत 7 धावा केल्या. 6.4 षटकांनंतर भारताची धावसंख्या 51/0 आहे. दुसऱ्या षटकात शेफालीने चौकारासह स्कोअरबोर्ड सुरू केला. त्यानंतर भारतीय जोडीने आफ्रिकन गोलंदाजांचा लयच बिघडवला. दरम्यान, भारत आपली पहिली महिला विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे सरकत आहे.
नाणेफेक आणि कर्णधारांचे वक्तव्य
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितलं की ढगाळ वातावरणामुळे तीही प्रथम गोलंदाजी करणार होती, मात्र आता फलंदाजीची संधी मिळाल्याने संघ मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा -Ind vs South Africa Women's World Cup Final : साऊथ आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, भारत करणार फलंदाजी
संघात कोणतेही बदल नाहीत
भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारताकडून शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, रिचा घोष, अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चर्नी आणि रेणुका सिंग ठाकूर या खेळाडू मैदानात उतरल्या आहेत.
हेही वाचा - Rajesh Banik: भारतीय अंडर-19 संघातील माजी खेळाडू राजेश बानिक यांचे निधन; त्रिपुरा क्रिकेटला मोठा धक्का
दक्षिण आफ्रिकेचा संघ
दक्षिण आफ्रिकेच्या संघात लॉरा वुलवार्ड (कर्णधार), ताझमिन ब्रिट्स, अँनेके बॉश, सुने लुस, मॅरिझॅन कॅप, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), अँरी डेरक्सेन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, अयाबोंगा खाका, नोनकुलुलेको म्लाबा यांचा समावेश आहे.