सध्या चेन्नई सुपर किंग्जमध्ये असलेल्या 20 वर्षाच्या आयुष म्हात्रेच्या नावावर एक वाईट रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. काल 11 एप्रिलला पार पडलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध चेन्नईस सुपर किंग्ज या सामन्यात तरूण फलंदाज आयुष म्हात्रेने 36 चेंडूत 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याला रिटायर्ड आऊट करण्यात आले. चेन्नईस सुपर किंग्जचा फलंदाज आयुष म्हात्रे हा आयपीएलमध्ये 'रिटायर्ड आऊट' होणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
DC विरुद्धच्या सामन्यात, CSK च्या डावातील 18 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूनंतर, 36 चेंडूत 59 धावांची खेळी करून म्हात्रेने मैदान सोडले. रिटायर्ड आऊट होण्यापूर्वी आयुष म्हात्रेने संजू सॅमसन याच्या भागीदारीसह 113 धावा ठोकल्या. 17.3 ओव्हरच्या अखेरीस 175/2 अशी धावसंख्या असलेल्या चेन्नईस सुपर किंग्ज संघाने, अखेरीस 212/2 अशी एकूण धावसंख्या उभारली. सीएसकेला शेवटच्या ओव्हरमध्ये वेगाने धावा करायच्या होत्या.
शेवटच्या ओव्हरमध्ये लुंगी एन्गिडी आणि टी नटराजन यांच्याविरूद्ध सीएसकेला धावा करण्यात अपयश येत होतं. त्यामुळे चेन्नईने शिवम दुबेला आत पाठवत मोठा निर्णय घेतला. दुबेने मैदानात येताच त्यांच्या आक्रमक फलंदाजीने सीएसकेला 200 धावांच्या पार पोहचवले. ज्यामुळे चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 2 बाद 212 धावा करता आल्या. दरम्यान आयपीएलच्या इतिहासात 'रिटायर्ड आऊट' होणारा म्हात्रे हा सहावा क्रिकेटपटू ठरला आहे.