Saturday, January 25, 2025 08:53:22 AM

Big blow for New Zealand cricket
न्यूझीलंड क्रिकेटसाठी मोठा झटका

मार्टिन गप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

न्यूझीलंड क्रिकेटसाठी मोठा झटका 

मुंबई : न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज मार्टिन गप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 38 वर्षीय गप्टिलने ऑक्टोबर 2022 मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मात्र, तो जागतिक स्तरावरील विविध टी20 लीगमध्ये खेळत राहणार आहे. सध्या तो न्यूझीलंडच्या सुपर स्मॅश स्पर्धेत ऑकलँडसाठी खेळत आहे. पाकिस्तान सुपर लीग (PSL) ड्राफ्टमध्ये देखील सहभागी झाला आहे, गेल्या वर्षी मार्टिन गप्टिलने पाकिस्तान सुपर लीगमध्ये  इस्लामाबाद युनायटेड संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 

गप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी न्यूझीलंडसाठी  त्याने स्वतःची वेगळी छाप पाडली आहे. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उत्तम राहिली आहे . त्याने 198 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7346 धावा केल्या आहेत, ज्यामुळे तो न्यूझीलंडसाठी रॉस टेलर (8607) आणि स्टीफन फ्लेमिंग (8007) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च धावसंख्येचा फलंदाज ठरला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो अजूनही न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 122 सामन्यांमध्ये 31.81 च्या सरासरीने आणि 135.70 च्या स्ट्राइक रेटने 3531 धावा केल्या आहेत.


2015 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने शानदार कामगिरी केलेली. त्याने उपांत्यपूर्व फेरी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध  237 धावांची नाबाद खेळीदेखील केलेली. मार्टिन गप्टिल त्याचा आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जायचा.  तो आयपीएलमध्ये (IPL)  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) या संघांसाठी खेळला आहे. 


सम्बन्धित सामग्री