Thursday, March 20, 2025 08:27:12 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुखापतींचं सवाट

भारत,ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाचे मुख्य खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार

चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुखापतींचं सवाट

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सगळ्या गोष्टी सज्ज आहेत.आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं 8 वर्षांनी पुनरागमन होत आहे. 1996 नंतर पहिल्यांदाच आयसीसीची स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. पाकिस्तान हे चॅम्पियन्स ट्रॉफीचे गतविजेते आहेत. 

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अनुपस्थिती राहणार आहे ती मोठ्या खेळाडूंची. अनेक देशांचे मुख्य खेळाडू आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार आहेत. या गोष्टीचा फटका चॅम्पियन्स ट्रॉफीला नक्कीच बसणार. ऑस्ट्रेलिया संघाच्या निवड झालेल्या 15 खेळाडूंपैकी 5 खेळाडूंनी एकतर माघार घेतली आहे किंवा दुखापतीमुळे बाहेर गेलेले आहेत. भारताकडून मुख्य अनुपस्थिती आहे ती जसप्रीत बुमराहची. पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार आहे. भारताला बुमराची कमी क्षणोक्षणी जाणवणार आहेच, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीनेदेखील ही दुःखाची बाब आहे. 

ऑस्ट्रेलियाकडून अनेक खेळाडू खेळताना दिसणार नाही आहेत. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, मिचेल मार्श आणि मार्कस स्टोइनीस खेळणार नाहीत. पॅट कमिन्स,जोश हेजलवूड आणि  मिचेल मार्श हे दुखापतीमुळे मुकले आहेत. तर, मिचेल स्टार्कने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोइनिसने तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधूनच निवृत्ती घेतली आहे. 

दक्षिण आफ्रिका संघाकडून ऑनरिक नॉरखिया आणि जेराल्ड कॉटझीया दुखापतीमुळे खेळणार नाहीयेत. इंग्लंडकडून उदयोन्मुखी खेळाडू जेकब बेथल खेळताना दिसणार नाही. अफगाणिस्थानचा फिरकी गोलंदाज एएम गजनफर चॅम्पियन्स ट्रॉफी समवेत आयपीएलला  मुकणार आहे. 
 हॅरिस रौफ आणि रचिन रवींद्र हे खेळाडूदेखील दुखापतग्रस्त आहेत. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत फिट होतील अशी अपेक्षा आहे. 

या खेळाडूंच्या नसण्याने अनेक खेळाडूंना संधी मिळणार आहे. आता हे बघण्यायोग्य असेल की कोणते खेळाडू या संधीचे सोनं करणार. 


सम्बन्धित सामग्री