Monday, June 23, 2025 11:43:48 AM

मोठी बातमी! बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल

क्रिकेटपटू विराट कोहलीविरुद्ध क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार ज्येष्ठ समाजसेवक एच.एम. वेंकटेश यांनी दाखल केली आहे.

मोठी बातमी बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल
Virat Kohli
Edited Image

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 4 जून रोजी बेंगळुरूमध्ये आयपीएल 2025 ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा केला. यावेळी लाखो लोक आपल्या क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमले होते. या दरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली आणि 11 जणांचा जीव गेला. या प्रकरणी 6 जून रोजी सकाळी 4 आरसीबी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. आता या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. किंग कोहलीविरुद्ध आता तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विराट कोहलीच्या अडचणी वाढल्या - 

क्रिकेटपटू विराट कोहलीविरुद्ध क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार ज्येष्ठ समाजसेवक एच.एम. वेंकटेश यांनी दाखल केली आहे. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी स्पष्टीकरण जारी केले आहे की, तक्रारीचा विचार आधीच नोंदवलेल्या गुन्ह्याअंतर्गत केला जाईल आणि चालू तपासादरम्यान त्याची चौकशी केली जाईल.

हेही वाचा - चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई! कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवाची हकालपट्टी

आयपीएल 2025 मध्ये आरसीबीने पंजाब किंग्जविरुद्ध शानदार कामगिरी करून पहिले विजेतेपद जिंकले. आरसीबीने तब्बल 17 वर्षांपासून आयपीएल ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. या आनंदात आरसीबीने दुसऱ्या दिवशी 4 जून रोजी बंगळुरूमध्ये जल्लोष करण्याचा निर्णय घेतला. बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी मैदानाबाहेर सुमारे 3 लाख चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूला आणि संघाला पाहण्यासाठी जमले होते. परंतु, या स्टेडियमची क्षमता सुमारे 35 हजार एवढीचं आहे. 

हेही वाचा - बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह 4 जणांना अटक

दरम्यान, खेळाडूंना पाहण्यासाठी लोकांनी स्टेडियमबाहेरील गेटवरून उड्या मारल्या. त्यानंतर अचानक चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या दुर्दैवी घटनेत 11 जणांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय यात 50 हून अधिक लोक जखमी झाले. कर्नाटक सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये भरपाई जाहीर केली आहे. तथापि, आरसीबीने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणाही केली आहे.


सम्बन्धित सामग्री