मुंबई: भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याची गणना सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली यांच्यासारख्या महान खेळाडूंशी केली जाते. त्याच्या होणाऱ्या या स्तुतीचा तो हकदारदेखील आहे. बुमराहने क्षणोक्षणी भारताला त्याच्या कामगिरीने पुनरागमन करून दिले आहे. त्याच्या याच उत्तम कामगिरीमुळे त्याला ICC (International Cricket Council) ने 2024 या वर्षाचा क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे.
2024 या वर्षात जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट कामगिरी केली. मुख्यतः कसोटी क्रिकेट आणि टी 20 क्रिकेटमध्ये 2024 मध्ये सातत्याने जसप्रीत ने उत्तम कामगिरी केली. 2024 मध्ये वेस्ट ईंडीझमध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्याने 8.26 च्या सरासरीने आणि 4.17 च्या इकॉनॉमीने 15 बळी घेतेले होते. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला हरवू शकला.
2024 या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहने वेळोवेळी भारताला सामन्यात पिछाडत असताना स्वतःच्या जोरावर पुनरागमन करून दिले. 2024 या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इंग्लंडचा संघ भारतात 5 कसोटी सामने खेळण्यासाठी आलेला. या मालिकेत जसप्रीत 4 सामने खेळाला. त्यात बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी केली. या मालिकेचं विशेष आकर्षण राहिलं ते म्हणजे जसप्रीत बुमराहची गोलंदाजी. विशाखापटणमच्या मैदानात तापमान 37 अंश सेल्सिअस होता. त्या परिस्थितीतही जसप्रीत 140 च्या गतीने गोलंदाजी करत होता आणि इंग्लंडच्या फलंदाजांना त्याने चीत केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्दच्या कसोटी मालिकेतील पाचही सामने तो खेळला आणि 32 बळी घेऊन सर्वात जास्त बळी घेणारा खेळाडू तो ठरला. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर म्हणूनदेखील घोषित करण्यात आलं. विशेष म्हणजे तो टी 20 वर्ल्ड कपचादेखील मालिकावीर होता २०२४ मध्ये १४ च्या सरासरीने ७१ बळी बुमराहने घेतले.
विशेष म्हणजे 2024 मध्ये जसप्रीत एकही एकदिवसीय सामना खेळाला नाही. यापूर्वी भारतासाठी ICC Men’s Cricketer of the Year हा पुरस्कार राहुल द्रविड (2004), आर अश्विन (2016) आणि विराट कोहली (2018) ने जिंकला होता.