मुंबई : मुंबईत राहणारे माजी रणजीपटू नरेश चुरी यांचे निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केले असताना उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे ते दत्तकपुत्र होते.
मुंबईतील शिवाजी पार्क येथील रहिवासी असलेल्या नरेश चुरी यांना शिवाजी पार्क जिमखान्याजवळील सुश्रुषा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली.
नरेश चुरी यांची कारकीर्द
नरेश चुरी रेल्वे संघातर्फे रणजीच्या मैदानात उतरले. त्यांनी १९८२-८३ ते १९८८-८९ या काळात २६ प्रथम श्रेणी सामने खेळले. यामध्ये ३२.६६ च्या सरासरीने त्यांनी दोन शतकांसह सात अर्धशतके लगावत १५०१ धावा ठोकल्या होत्या.
महत्त्वाचे मुद्दे -
रणजीपटू नरेश चुरी यांचे निधन
वयाच्या ६१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास