Tuesday, March 17, 2026 03:19:08 PM

IND vs PAK: टीम इंडियाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी 'हिटमॅन' मैदानात; कोलंबोमध्ये रोहित शर्माचा खेळाडूंशी संवाद

भारताचा माजी यशस्वी कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी थेट स्टेडियममध्ये दाखल झाला आहे. रोहितची उपस्थिती पाहून खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

ind vs pak टीम इंडियाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हिटमॅन मैदानात कोलंबोमध्ये रोहित शर्माचा खेळाडूंशी संवाद

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याने T20 World Cup 2026 चे वातावरण तापले आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणाऱ्या या 27 व्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा सुखद धक्का मिळाला. भारताचा माजी यशस्वी कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी थेट स्टेडियममध्ये दाखल झाला आहे. रोहितची उपस्थिती पाहून खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

टॉसपूर्वी मैदानावर साधला संवाद
नाणेफेकीपूर्वी (Toss) रोहित शर्मा मैदानात उतरला आणि त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंशी बराच वेळ चर्चा केली. केवळ खेळाडूच नव्हे, तर कोचिंग स्टाफशीही तो संवाद साधताना दिसला. सामन्याच्या दडपणाच्या काळात आपला अनुभव खेळाडूंशी शेअर करतानाचा रोहितचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या भेटीचे वर्णन 'मेंटरची भूमिका' असे केले असून, रोहितच्या आगमनाने संघाची ताकद वाढल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा - IND WA vs PAK WA: अवघ्या 10.1 ओव्हरमध्ये पाकिस्तानचे पॅकअप, भारताचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय

आयसीसी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून उपस्थिती
रोहित शर्मा या T20 World Cup 2026 साठी आयसीसीचा (ICC) अधिकृत ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. याच भूमिकेतून तो जगभर क्रिकेटचा प्रचार करत असला, तरी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी तो खास करून भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी पोहोचला आहे. मैदानाबाहेरून का असेना, पण रोहितचे मार्गदर्शन खेळाडूंसाठी या महत्त्वाच्या सामन्यात मोलाचे ठरणार आहे.

चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण
आर. प्रेमदासा स्टेडियमवर जेव्हा रोहित दिसला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केले. त्याच्या उपस्थितीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण लढतीत भारतीय संघ अधिक जोमाने मैदानात उतरला असल्याचे चित्र दिसत आहे.


सम्बन्धित सामग्री