ICC Women Player of the Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (ICC) ने नोव्हेंबर 2025 महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकित खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत पुरुष गटात कोणताही भारतीय खेळाडू नाही, तर महिला गटात टीम इंडियाची सलामीवीर शेफाली वर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा - Hardik Pandya: हार्दिक पांड्यामुळे तडकाफडकी बदलावं लागलं स्टेडियम; नेमकं काय झालं?
शफाली वर्माची महत्त्वाची कामगिरी
शेफाली वर्मा हिने महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पहिल्या विश्वचषकासाठी टीम इंडियाचा भाग नसलेल्या शेफालीचा समावेश सलामीवीर प्रतीका रावलच्या दुखापतीनंतर करण्यात आला. शेफालीने दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात 87 धावा केल्या आणि दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, ज्यामुळे तिला नोव्हेंबर महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले. तिला यूएईची ईशा ओझा आणि थायलंडची थिपाचा पुथावोंग यांच्याकडून आव्हान मिळणार आहे, ज्यांनी आयसीसी महिला इमर्जिंग नेशन्स ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली होती.
हेही वाचा - ICC ODI Rankings: विराट कोहली की रोहित शर्मा? ICC वनडे रँकिंगमध्ये कोण आहे अव्वल?
पुरुष गटात नामांकित खेळाडू
पुरुष गटात नोव्हेंबर महिन्यासाठी तीन खेळाडूंना नामांकन मिळाले आहे:
सायमन हार्मर (दक्षिण आफ्रिका) - भारत दौऱ्यादरम्यान कसोटी मालिकेत 8.94 च्या सरासरीने 17 बळी घेतले. त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
तैजुल इस्लाम (बांगलादेश) - आयर्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत 13 बळी घेतले.
मोहम्मद नवाझ (पाकिस्तान) - नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी-20 मालिकेत बॅट आणि बॉल दोन्हीने शानदार कामगिरी. नोव्हेंबर महिन्यातील या प्रदर्शनानंतर, शेफाली वर्माने एकमेव भारतीय महिला खेळाडू म्हणून जागतिक क्रिकेट व्यासपीठावर नाव कमावले. तथापी, पुरुष गटात मात्र, कोणालाही नामांकन मिळाले नाही.