Monday, November 04, 2024 11:00:10 AM

India vs New Zealand
भारत १२५ धावांनी पिछाडीवर

बंगळुरू कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारत १२५ धावांनी पिछाडीवर आहे.

भारत १२५ धावांनी पिछाडीवर

बंगळुरू : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरू येथे होत आहे. बंगळुरू कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारत १२५ धावांनी पिछाडीवर आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर सुरू झालेल्या बंगळुरू कसोटीत नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा पहिला डाव ४६ धावांत आटोपला. यानंतर न्यूझीलंडने त्यांच्या पहिल्या डावात सर्वबाद ४०२ धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात आतापर्यंत ३ बाद २३१ धावा केल्या आहेत. सर्फराझ खान ७० धावांवर खेळत आहे. विराट कोहली ७० तर कर्णधार रोहित शर्मा ५२ धावा करुन बाद झाला. यशस्वी जयस्वालने ३५ धावा केल्या. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo