मुंबई: भारत आणि इंग्लंड संघामधील दुसरा टी 20 सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानात झाला. प्रथम सामन्याप्रमाणे या सामन्यातदेखील भारताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्याच षटकात अर्षदिप सिंगने फिल सॉल्टला माघारी धाडलं. सामन्याच्या चौथ्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने बेन डकेटला बाद केलं. तिसऱ्या क्रमांकावर आलेला इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने प्रथम इंग्लंडचा डाव सावरला आणि मग आक्रमक फलंदाजी करून भारतीय गोलंदाजांना 'बॅकफूट'वर आणले. पण, बटलरला बाकी फलंदाजांकडून हवी तशी साथ लाभली नाही. सातव्या षटकात वरूण चक्रवर्तीने हॅरी ब्रूकला माघारी धाडलं तर दहाव्या षटकात अक्षर पटेलने जोस बटलरला बाद केलं. आक्रमक फलंदाज लिअम लिविंगस्टनदेखील जास्त प्रभाव टाकू शकला नाही. लिविंगस्टनने 14 चेंडूत 13 धावा केल्या. पहिलाच आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळात असणारा जेमी स्मिथने जलद 22 धावा केल्या. तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ब्रेडन कार्सने 17 चेंडूत 31 धावा केल्या. त्याच्या या योगदानामुळे इंग्लंडचा संघ 165 धावांपर्यंत मजल मारू शकला.
भारताकडून अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 2-2 तर अर्षदिप, हार्दिक, वॉशिंग्टन सुंदर आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.
भारताची फलंदाजीत सुरवात खराब झाली संजू सॅमसन 5 तर अभिषेक शर्मा 12 धावांवर बाद झाले. भारताची स्तिथी 2 बाद 19 अशी झाली. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांमध्ये भागेदारी झाली. मात्र, 3 चौकार खेचून तो इंग्लंडच्या कार्सला बाद झाला. ध्रुव जुरेल आणि हार्दिक पंड्यादेखील जास्त प्रभाव टाकू शकले नाहीत. हार्दिक बाद झाल्यांनतर मैदानात आला वॉशिंग्टन सुंदर. तिलक आणि सुंदर यांनी भारताचा डाव सावरला. त्यांनी भारताची धावसंख्या 5 बाद 78 वरून 5 बाद 116 वर नेला. १116 च्या धावसंख्येवर वॉशिंग्टन सुंदर बाद झाला त्यानंतर अक्षर पटेल आणि अर्षदिप सिंग हे दोघे देखील बाद झाले.
एकाकी झुंझ देत असलेल्या तिलक वर्माला साथ मिळेल का ? तो भारताला विजय मिळवून देऊ शकले का ? असे प्रश्न उध्दभवत होते. पण, तिलक वर्माने त्याला भविष्यातील स्टार खेळाडू का म्हणतात हे दाखवले. 24 चेंडूत 47 धावांची भारताला गरज होती आणि तिलक वर्माने आक्रमक फलंदाजीला सुरवात केली. त्याच्या या खेळीचं आकर्षण ठरलं, ते त्याने जोफ्रा आर्चरला स्केवर लेगच्या दिशेने बसून मारलेला षटकार. त्याने 72 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात 6 धावांची गरज भारताला होती आणि तिलकने पहिल्या चेंडूवर 2 धावा काढल्या तर दुसऱ्या चेंडूवर त्याने आर्चरला चौकार खेचला आणि भारताला विजय मिळवून दिला.
तिलकच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.