मुंबई - भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने गेली १० वर्ष बॉर्डर- गावसकर मालिका (Border–Gavaskar Trophy) गमावली नव्हती. आता १ दशकानंतर ऑस्ट्रेलियाने बॉर्डर- गावसकर मालिकेवर कब्जा केला आहे. आता ही मालिका झाल्यानंतर, भारतीय संघाचं संपूर्ण लक्ष इंग्लंडविरुद्ध (England) होणाऱ्या टी-२० (T20) आणि वनडे (ODI) मालिकेवर असणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy) स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा संघ भारतात मर्यादीत षटकांची मालिका खेळण्यासाठी येणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी अजूनही भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच या मालिकेसाठी संघाची घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान कोणत्या खेळाडूंना संघात स्थान मिळणार? कसा असेल संभावित संघ? जाणून घ्या.
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग आणि जितेश शर्मा या फलंदाजांना संधी दिली जाऊ शकते. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी यांना संधी दिली जाऊ शकते. तर गोलंदाज म्हणून हर्षित राणा, अर्शदीप सिंग, रवि बिश्नोई आणि खलिल अहमद यांना संधी दिली जाऊ शकते. मयांक यादव अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे त्याला संघात संधी मिळणार की नाही, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग 11
सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या,अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मयांक यादव (फिट असेल तर), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, खलिल अहमद