कानपूर : भारताने बांगलादेश विरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका २ - ० अशी जिंकली. चेन्नई आणि कानपूरची कसोटी जिंकत भारताने मालिकेत निर्भेळ यश मिळवले. या विजयामुळे भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान कायम राखले. भारताच्या विजयाची टक्केवारी आता ७४.२४ टक्के एवढी झाली आहे. याआधी चेन्नईची कसोटी जिंकली त्यावेळी भारताच्या विजयाची टक्केवारी ७१.६७ टक्के एवढी होती.
पावसाच्या व्यत्ययामुळे कानपूर कसोटीतला जवळपास तीन दिवसांचा खेळ वाया गेला. यामुळे ही कसोटी अनिर्णित राहील असे वाटत होते. पण गोलंदाजांनी कमाल केली आणि भारताने कानपूर कसोटी सात गडी राखून जिंकली.
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिका
कानपूर कसोटी : भारताचा सात गडी राखून विजय
बांगलादेश पहिला डाव : सर्वबाद २३३ धावा
भारत पहिला डाव : ९ बाद २८५ धावा, डाव घोषीत
बांगलादेश दुसरा डाव : सर्वबाद १४६ धावा
भारत दुसरा डाव : ३ बाद ९८ धावा
चेन्नई कसोटी : भारताचा २८० धावांनी विजय
भारत पहिला डाव : सर्वबाद ३७६ धावा
बांगलादेश पहिला डाव : सर्वबाद १४९ धावा
भारत दुसरा डाव : ४ बाद २८७ धावा
बांगलादेश दुसरा डाव : सर्वबाद २३४ धावा