मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025साठी भारताने आपला 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी संघ जाहीर करणारा भारत हा 7वा देश होता. आता फक्त एकच देश संघ जाहीर करण्याचा बाकी आहे आणि तो म्हणजे पाकिस्तान.
भारतीय संघात मोठे फेरबदल झाले आहेत. 15 पंधरा खेळाडूंच्या संघात मोहम्मद सिराजला स्थान मिळाले नाही. मात्र, मोहम्मद शमीचं भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन झालेलं आहे. वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना हा शमी ने खेळलेला शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. त्याच बरोबर मुंबईचा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यरलादेखील या संघात समाविष्ट करण्यात आले. भारतीय कसोटी आणि टी २० संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालला संघात स्थान मिळालेला आहे. त्याला रोहित शर्मा किंवा शुभमन गिल यांचा 'बॅकअप' पर्याय म्हणून बघितलं जात आहे.
15 खेळाडूंच्या या संघात भारताने जास्तीत जास्त फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे 4 फिरकी गोलंदाज या संघात आपलं स्थान बनवू शकले. रोहित शर्मा या संघाचा कर्णधार असेल तर शुभमन गिलला उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे.
सर्वात मुख्य प्रश्न म्हणजे सिराजला का वागण्यात आलं ? याचं मुख्य कारण आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे भाताचे सर्व सामने दुबईमध्ये असणार आहेत. दुबईची उष्ण परिस्थिती फिरकी गोलंदाजांना मदत देतात. त्यामुळे जास्त भर फिरकी गोलंदाजांवर देण्यात आला. दुसरे कारण असे आहे की भारताने जर सिराजला निवडलं असतं तर 4 ही वेगवान गोलंदाज हे उजव्या हाताने गोलंदाजी जाणारे गोलंदाज झाले असते. सिराजच्या जागी भारताने पंजाबचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्षदिप सिंहला प्राधान्य दिलं. गेल्या 6 महिन्यातील त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. तिसरे कारण असे आहे की भारतीय संघात शमीचे पुनरागमन झाले. त्याची 2023 च्या वर्ल्ड कप मधली कामगिरी नजरेत ठेवता जर तो उपलब्ध असेल तर त्याला वगळणे चुकीचे ठरेल. या तीन कारणांमुळे सिराजला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.