Tuesday, February 17, 2026 08:38:24 AM

Bangladesh Cricket Controversy : वर्ल्ड कपमधून बांगलादेश हद्दपार? ICC च्या नियमावलीतील 'त्या' कलमाने वाढली शेजारच्या देशाची धाकधूक

भारतात होणाऱ्या सामन्यांना विरोध करणाऱ्या बांगलादेशला आयसीसीने आता थेट इशारा दिला असून 21 जानेवारी ही अंतिम मुदत (Deadline) निश्चित केली आहे.

bangladesh cricket controversy  वर्ल्ड कपमधून बांगलादेश हद्दपार icc च्या नियमावलीतील त्या कलमाने वाढली शेजारच्या देशाची धाकधूक

Bangladesh Cricket Controversy: आगामी आयसीसी वर्ल्ड कपवरून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे आता त्यांच्यावरच कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतात होणाऱ्या सामन्यांना विरोध करणाऱ्या बांगलादेशला आयसीसीने आता थेट इशारा दिला असून 21 जानेवारी ही अंतिम मुदत (Deadline) निश्चित केली आहे. जर बांगलादेश आपल्या हट्टावर ठाम राहिला, तर त्यांना वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो का? यावर क्रिकेटच्या नियमावलीने मोठे संकेत दिले आहेत.

काय आहे वादाचे मुख्य कारण?

बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय अराजकतेचा परिणाम आता क्रिकेटच्या मैदानावर दिसू लागला आहे. बांगलादेशच्या खेळाडूंना आयपीएलमधून (IPL) वगळल्यानंतर, त्याचा बदला घेण्यासाठी बांगलादेशने भारतात वर्ल्ड कपचे सामने खेळण्यास नकार दिला आहे. आम्ही भारतात खेळणार नाही, अशी भूमिका घेत बांगलादेशने आयसीसीकडे सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी केली. मात्र, आयसीसीने ही मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.

हेही वाचा - Indian Cricket Team: विराट आणि रोहित आता क्रिकेट खेळणार नाहीत? नेमकं काय घडलंय...

काय सांगतो आयसीसीचा नियम?

क्रिकेट विश्वातील सर्वोच्च संस्था असलेल्या आयसीसीकडे वर्ल्ड कप आयोजनाचे आणि सहभागाचे सर्व सर्वाधिकार सुरक्षित असतात. नियमानुसार, एखादा देश पात्र ठरला असला तरी, जर तो विनाकारण स्पर्धेच्या वेळापत्रकात अडथळा आणत असेल किंवा यजमान देशात खेळण्यास नकार देत असेल, तर आयसीसी कठोर कारवाई करू शकते. तसेच जर एखाद्या देशाची मागणी स्पर्धेच्या मूळ संरचनेला धक्का लावणारी असेल, तर आयसीसी ठोस पुराव्यांच्या आधारे त्या देशाला स्पर्धेतून बाद करू शकते. या स्थितीत राखीव किंवा पात्रता फेरीतील पुढील क्रमांकाच्या संघाला संधी दिली जाऊ शकते.

हेही वाचा - Rohit Sharma : भारतीय क्रिकेटमध्ये केवळ 6 जणांनाच जमलं, ते आता रोहितनेही करून दाखवलं; घरच्या मैदानावर केला 'हा' पराक्रम

बांगलादेशची कोंडी  

भारतातील हिंदूंवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी बांगलादेशी खेळाडूंवर बहिष्कार टाकला आहे. आता आयसीसीने दिलेल्या 21 जानेवारीच्या डेडलाईनमुळे बांगलादेशची कोंडी झाली आहे. त्यांना एकतर नमते घेऊन भारतात खेळावे लागेल किंवा वर्ल्ड कपमधील आपले स्थान गमवावे लागेल.


सम्बन्धित सामग्री