Tuesday, January 14, 2025 05:58:51 AM

IPL 2025
आयपीएलमधल्या खेळाडूंना एक कोटींचा बोनस

आयपीएलमधील प्रत्येक खेळाडूला आता एक कोटी आणि पाच लाख रुपयांना बोनस मिळणार आहे.

आयपीएलमधल्या खेळाडूंना एक कोटींचा बोनस

नवी दिल्ली : आयपीएलमधील प्रत्येक खेळाडूला आता एक कोटी आणि पाच लाख रुपयांना बोनस मिळणार आहे. पण यासाठी प्रत्येक खेळाडूसाठी एक गोष्ट महत्वाची असणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही ऐतिहासिक घोषणा केली आहे.
जय शहा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, " आयपीएलमधील प्रत्येक संघाला सामन्याचे शुल्क देण्यासाठी १२ कोटी आणि ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूला ७.५० लाख रुपयांचे सामना शुल्क मिळणार आहे. पण एक रुपयांचा बोनस मात्र वेगळा असणार आहे."

जय शहा यांनी पुढे सांगितले की, " आयपीएलमधले जे खेळाडू यावेळी प्रत्येक सामना खेळतील त्यांना एक खास बोनस देण्यात येणार आहे. आयपीएलच्या हंगामातील जो खेळाडू प्रत्येक सामना खेळेल त्यांना एक कोटी आणि पाच लाखांची रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम खेळाडूंच्या कराराशी संबंधित नसेल किंवा त्यांचा अन्य कोणत्याही गोष्टीशी संबंधित नसेल. हा खेळाडूंसाठी एक खास बोनस असणार आहे."

महत्त्वाचे मुद्दे -

  • आयपीएलमधल्या खेळाडूंना एक कोटींचा बोनस
  • जय शहांची माहिती


 


सम्बन्धित सामग्री