Friday, April 25, 2025 09:15:31 PM

IPL 2025 ग्रँड ओपनिंग: रंगारंग सोहळ्यानंतर KKR vs RCB महामुकाबला

आजपासून आयपीएल २०२५ च्या थराराला सुरूवात होणार आहे. कोलकाताच्या मैदानावर रंगारंग कार्यक्रम झाल्यानंतर केकेआर आणि आरसीबीचा संघ एकमेकांशी भिडणार आहेत.

ipl 2025 ग्रँड ओपनिंग रंगारंग सोहळ्यानंतर kkr vs rcb महामुकाबला
IPL 2025 ग्रँड ओपनिंग: रंगारंग सोहळ्यानंतर KKR vs RCB महामुकाबला

कोलकाता : क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील रोमांचक सलामीच्या सामन्याने या हंगामाला सुरुवात होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही IPL च्या नव्या हंगामाची सुरुवात भव्य उद्घाटन सोहळ्याने होणार आहे. सायंकाळी 6 वाजता सुरू होणाऱ्या या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी, सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि प्रतिभावान कलाकार करण ओलिजा आपली कला सादर करणार आहेत. 35 मिनिटांच्या या सोहळ्यात संगीत, नृत्य आणि लाईट शो चाहत्यांचे मनोरंजन करेल. ईडन गार्डन्सचे एक लाख प्रेक्षक या सोहळ्याला प्रत्यक्ष अनुभवतील. तर स्टार स्पोर्ट्सवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. 

हेही वाचा - IPL 2025: आयपीएल 2025 उद्घाटन सोहळ्यात 'या' अभिनेत्री आणि गायिका करणार लाईव्ह परफॉर्मन्स

नवे हंगाम, नवे नेतृत्व
IPL 2025 मध्ये अनेक संघांनी आपले नेतृत्व बदलले आहे. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स यंदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तर श्रेयस अय्यर आता पंजाब किंग्जचा कर्णधार बनला आहे. अक्षर पटेलला दिल्ली कॅपिटल्सने नवे नेतृत्व सोपवले आहे. लिलावानंतर संघांमध्ये मोठे फेरबदल झाले असून काही संघ नव्या संयोजनासह विजेतेपदाच्या शर्यतीत उतरले आहेत.

हेही वाचा - Yuzvendra Chahal Viral T-Shirt: युझवेंद्रने दिला टी-शर्टद्वारे अनोखा टोमणा

IPL 2025 मध्ये 10 संघ विजेतेपदासाठी आपापसात झुंज देतील. दोन महिने चालणाऱ्या या क्रिकेट महायुद्धात प्रत्येकी 14 सामने खेळल्यानंतर अव्वल 4 संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचतील. अंतिम सामना 25 मे रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने-सामने येणार आहेत. उभय संघातील हा सामना कोलकातामध्ये होणार असून हा सामना प्रेक्षकांना जिओ हॉटस्टारवर देखील पाहता येणार आहे.  

 

 

 


सम्बन्धित सामग्री