Saturday, February 14, 2026 12:49:21 PM

T20 Series : टीम इंडियात मोठी उलथापालथ; तिलक वर्माच्या एन्ट्रीने 'हा' स्टार खेळाडू प्लेईंग 11 मधून आऊट?

आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर स्वतःला सिद्ध करण्याची ही संजूसाठी सुवर्णसंधी होती, परंतु त्याच्या सलग अपयशाने आता त्याच्या टीम इंडियामधील स्थानावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

t20 series  टीम इंडियात मोठी उलथापालथ तिलक वर्माच्या एन्ट्रीने हा स्टार खेळाडू प्लेईंग 11 मधून आऊट

T20 Series : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेत शानदार कामगिरी केली आहे. मात्र, या यशाच्या जल्लोषात यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनसाठी चिंतेचे ढग गडद झाले आहेत. आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर स्वतःला सिद्ध करण्याची ही संजूसाठी सुवर्णसंधी होती, परंतु त्याच्या सलग अपयशाने आता त्याच्या टीम इंडियामधील स्थानावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यातच तिलक वर्माच्या पुनरागमनाच्या बातम्यांनी संजूच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत.

संजूचे सातत्यपूर्ण अपयश; संधी गमावण्याची भीती

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संजू सॅमसनला मिळालेल्या संधींचे तो सोनं करू शकला नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यात 10 धावा, दुसऱ्या सामन्यात केवळ 6 धावा आणि तिसऱ्या सामन्यात तर त्याचे खातेही उघडले नाही. सलग तीन सामन्यांमधील या खराब कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी कोणताही संघ सातत्याने अपयशी ठरणाऱ्या खेळाडूवर अवलंबून राहण्याची जोखीम पत्करणार नाही, असे चित्र सध्या दिसत आहे.

हेही वाचा - T20 World Record: जगात कोणीही न केलेला पराक्रम! टीम इंडियाने टी-20 इतिहासात रचला वर्ल्ड रेकॉर्ड

तिलक वर्माचे पुनरागमन  

दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला युवा फलंदाज तिलक वर्मा आता पूर्णपणे तंदुरुस्त होऊन परतण्याच्या तयारीत आहे. अहवालानुसार, तो शेवटच्या सामन्यापूर्वी किंवा विश्वचषकासाठी संघात सामील होऊ शकतो. तिलकच्या येण्यामुळे मधल्या फळीला मजबुती मिळणार आहे. दुसरीकडे, इशान किशनने आपल्या आक्रमक फलंदाजीने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला आहे. इशानचा फॉर्म पाहता त्याला संघातून बाहेर काढणे व्यवस्थापनासाठी कठीण निर्णय ठरेल.

अंतिम 11 मधून संजू बाहेर? नवी रणनीती काय?

बदलेल्या समीकरणांनुसार, इशान किशनला सलामीवीर म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते, तर तिलक वर्माला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे. या नवीन रणनीतीमुळे संजू सॅमसनला अंतिम अकरा खेळाडूंमधून बाहेर बसावे लागण्याची दाट शक्यता आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी आपली पहिली पसंती म्हणून ओळख निर्माण करण्याची संजूची ही संधी आता त्याच्या हातातून निसटताना दिसत आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या