Thursday, April 23, 2026 12:17:57 AM

RR vs MI IPL 2026 : MI चा स्टार खेळाडू विल जॅक्स RR विरूद्ध खेळणार?, बुमराहच्या गोलंदाजीसमोर वैभव सूर्यवंशीचा बल्ला चालणार?; राजस्थानच्या होमग्राऊंडवर रंगणार आजचा सामना

यपीएल 2026 चा 13 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघांची सुरुवात छान झाली आहे, पण तिसऱ्या सामन्यात विजय नोंदवावा अशी दोन्ही संघांची आशा असेल.

rr vs mi ipl 2026  mi चा स्टार खेळाडू विल जॅक्स rr विरूद्ध खेळणार बुमराहच्या गोलंदाजीसमोर वैभव सूर्यवंशीचा बल्ला चालणार राजस्थानच्या होमग्राऊंडवर रंगणार आजचा सामना

आयपीएल 2026 चा 13 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघांची सुरुवात छान झाली आहे, पण तिसऱ्या सामन्यात विजय नोंदवावा अशी दोन्ही संघांची आशा असेल. हा सामना गुवाहाटीच्या एसीए स्टेडियममध्ये होणार आहे,गुवाहाटी राजस्थानचे 2 सामन्यांसाठी होम ग्राउंड असेल. विशेष म्हणजे हे मैदान राजस्थानचा कर्णधार रियान परागचेदेखील होम ग्राउंड आहे. रियान पराग हा आसामचा पहिला खेळाडूदेखील आहे, जो भारतासाठी खेळला. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, त्यामुळे सामना अटीतटीचा होणार हे नक्कीच आहे. 

हेही वाचा - IPL 2026: IPL मध्ये 2400 कोटींचा तोटा? ललित मोदींचा मोठा दावा; धक्कादायक कारण समोर, BCCI चं नियोजन... 

मुंबईने या हंगामातील त्यांचा पहिला सामना जिंकून रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी केली. मुंबईने 13 वर्षांनी त्यांचा पहिला सामना जिंकला, पण ते दुसरा सामन्यात सामना जिंकण्यात असमर्थ ठरले. मुंबईच्या संघात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा हे भारतीय सुपरस्टार खेळाडू आहेत. त्यासोबत विदेशी खेळाडूदेखील चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. विल जॅक्स अद्याप संघासोबत जोडला गेला नाही आहे. त्याच्या येण्याने मुंबई इंडियन्सला आणखी बळ मिळेल. त्याने नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकात ४ वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार पटकावला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबईला नक्कीच फायदा होईल. मुंबईचे गोलंदाज अद्याप रंगात येताना दिसत नाहीत. बुमराहला बाकीच्या गोलंदाजांकडून योग्य ती साथ मिळाली, तर मुंबईला रोखणे अशक्य होईल. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या दुखापतीमुळे खेळला नव्हता, मात्र पुढील सामन्यात हार्दिक खेळेल अशी अपेक्षा संघ व्यवस्थापन करेल.

राजस्थानसाठी सर्व गोष्टी नीटनीटक्या चालल्या आहेत, पण सर्वत्र चर्चा मात्र वैभव सूर्यवंशींची आहे. वैभवच्या आक्रमक फलंदाजीवर सर्व फिदा आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये 18 वर्षांचा होण्याअगोदर सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत त्याने रेहमानुल्ला गुरबाझची बरोबरी केली आहे. जर त्याने एक षटकार खेचला, तर त्याचे 69 षटकार होतील आणि तो प्रथम क्रमांकावर येईल. विशेष म्हणजे वैभव आता फक्त 15 वर्षांचा आहे. दुसरीकडे, यशस्वी जैस्वाल उत्तम कामगिरी करत आहे. त्याने या हंगामात जास्त लोकांचे लक्ष वेधले नसले, तरीही राजस्थानसाठी तो महत्त्वाचा ठरतो. राजस्थानचे एक्सप्रेस गतीचे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर इतर संघांच्या फलंदाजांना त्यांच्या तालावर नाचवत आहेत. युजवेंद्र चहलच्या जाण्यानंतर राजस्थानला रवी बिश्नोईंच्या रूपात पहिल्यांदाच चांगला फिरकी गोलंदाज सापडला. 

हेही वाचा - Arjun Tendulkar Carrying Drinks : मास्टरब्लास्टरचा मुलगा शेवटी मेहनतच निवडणार; अर्जुनच्या 'त्या' कृतीने जिंकली अनेकांची मनं 


त्याची आणि रियान परागची जोडी अनेक राजस्थानसाठी 'रॉयल' कामगिरी  करेल,अशी अपेक्षा राजस्थानच्या चाहत्यांना असेल. मध्यमगती गोलंदाज ब्रिजेश शर्मा 
राजस्थान रॉयल्ससाठी 'फाईंड ऑफ द सीजन' आहे असं म्हटल्यास अजिबात वावगं ठरणार नाही. त्याला तुषार देशपांडे यानेदेखील चांगली साथ दिली आहे. 
त्यामुळे राजस्थान रॉयल्स परिपूर्ण संघ दिसत आहे. 

खेळपट्टी आणि परिस्थिती

  • या हंगामात आतापर्यंत गुवाहाटीमध्ये खेळल्या गेलेल्या एकमेव सामन्यात वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली: चेन्नई सुपर किंग्सचा संघ 127 धावांवर सर्वबाद झाला होता. सामन्यापूर्वी खेळपट्टी झाकून ठेवल्यामुळे सुरुवातीला निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. 

हायलाईट्स 

  • गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर MI चा हा पहिलाच सामना असेल.

सम्बन्धित सामग्री