बंगळुरूमध्ये चालू असलेल्या सैय्यद मुश्ताक अली करंडकात मुंबई संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. हा सामना मुंबई आणि बडोदा संघात झाला होता. या सामन्याची चर्चा मोठ्या प्रमाणात चालू होती. हा सामना भारतीय टी 20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव विरुद्ध मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या अशी पहिली जात होती.
प्रथम फलंदाजी केलेल्या बडोद्याच्या संघाने अभिमन्यू सिंह राजपूतला 23 च्या धावसंख्येवर गमावले. पण, बडोद्याचा कर्णधार कृणाल पंड्या आणि शाश्वत रावत या दोघांनी 50 धावांची भागेदारी केली. कृणाल पंड्याने 24 चेंडूत 30 धावांची खेळी केली. तर शाश्वत रावतीने 29 चेंडूत 34 धावांची खेळी केली. सुर्यांश शेगडेने कृणाल पंडयाची विकेट घेतली तर ऑफ स्पिनर तनुष कोटीयान ने शाश्वत रावतची विकेट घेतली. 73 वर 1 वरून 89 वर 5 अश्या स्तिथीत बडोदा येऊन पोहचले. हार्दिक पंड्याने 5 धावा केल्या. अष्टपैलू शिवम दुबेने स्वतःच्या गोलंदाजीवर त्याची झेल धरून त्याला बाद केलं. विष्णू सोळंकी देखील 6 धावांवर बाद झाला.
शिवालिक शर्मा आणि अतित शेठ यांचा प्रभावी धावांमुळे बडोद्याचा संघ 158 धावा करू शकला. शिवालिकने 24 चेंडूत 36 तर अतीत शेठने 14 चेंडूत 22 धावा केल्या. मुंबई तर्फे शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, तनुष कोटियान, अथर्व अंकोलेकर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला तर सुर्यांश शेगडेने 2 बळी घेतले.
मुंबईच्या फलंदाजीचा वेळी मुंबईने पृथ्वी शॉ ला 30 च्या धावसंख्येवर गमावला. पृथ्वी शॉने 9 चेंडूत 8 धावा केल्या. त्या नंतर मात्र मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेने कोणतीच संधी बडोदा संघाला दिली नाही. 28 चेंडूत राहणेने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. 10 षटकात मुंबईने 100 धावा गाठल्या. त्यांनतर फक्त 60 चेंडूत 59 धावा शिल्लक राहिल्या होत्या आणि मुंबईच्या हातात 9 विकेट्स होत्या. 118 च्या धावसंख्येवर श्रेयस अय्यर 46 वैयक्तिक धावांच्या धावसंख्येवर बाद झाला. जिंकण्यासाठी एक धाव आवश्यक असताना अजिंक्य राहणे 98 धावांच्या वैयक्तिक धाव संख्येवर बाद झाला. सुर्यांश शेगडेने षटकार खेचला आणि सामना संपवला.
15 डिसेंबरला सैय्यद मुश्ताक अली करंडकाचा अंतिम सामना असेल. हा सामना मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश असा रंगेल