Monday, February 10, 2025 12:34:03 PM

Remarkable Performance in England T20 Series
इंग्लंडविरुद्धच्या टी 20 मालिकेत 'या' तीन खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय

शेवटच्या टी 20 सामन्यात अभिषेक शर्माची तुफानी खेळी

इंग्लंडविरुद्धच्या टी 20  मालिकेत या तीन खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय 

मुंबई: भारत आणि इंग्लंडची टी 20 मालिका नुकतीच समाप्त झाली आहे. या संपूर्ण मालिकेत भारतीय संघाचे वर्चस्व दिसून आले. या मालिकेत इंग्लंड संघ फक्त एकच सामना जिंकू शकला. हा सामना राजकोटच्या मैदानात झाला होता. या मालिकेत बहुतेक भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली. पण, तीन खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा सर्व क्रिकेट रसिक आणि क्रिकेट तज्ञ करत आहेत. 

1. अभिषेक शर्मा:
पाचव्या टी 20 नंतर अभिषेक शर्माची चर्चा संपूर्ण जगभर होत आहे. अभिषेक शर्माच्या 135 धावांचा खेळींनंतर त्याने स्वतःची संघातली जागा अजून मजबूत केली आहे. 5 सामन्यात अभिषेकने 279 धावा केल्यात तसेच अभिषेकने 3 बळीदेखील घेतले आहेत. पाचव्या सामन्यात अभिषेकने 13 षटकार खेचले होते. याच सामन्यात त्याने दुसरं सगळ्यात वेगवान अर्धशतक आणि शतक ठोकले होते. 

2. वरुण चक्रवर्ती:
आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये  पुनरागमन केल्यानंतर वरूण चक्रवर्ती उत्तम कामगिरी करत आहे. गेल्या वर्षी वरुण चक्रवर्तीने 3 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं. त्याची कामगिरी गेल्यावर्षीच्या दक्षिण आफ्रिका मालिकेत आणि या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अप्रतिम राहिली. त्याच्या या कामगिरीमुळे वरुणला भारतीय एकदिवशीय संघात स्थानदेखील मिळालं. या मालिकेत वरुणने 14 बळी घेतले. राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात वरुणने 5 बळीदेखील घेतले होते.  

3. तिलक वर्मा:
तिलक वर्माने भारतीय संघाला सुखद धक्का दिला आहे. तिलकच्या चांगल्या कामगिरीमुळे भारतीय संघाकडे जास्त खेळाडूंचे पर्याय खुले झाले आहेत. तिलक वर्माने विरुद्ध झालेल्या टी 20 सामन्यात सलग 2 शतकीय खेळी केल्या होत्या. तसेच, या 5 सामन्यांच्या मालिकेत तिलकने 143 धाव केल्या आहेत. त्यात चेन्नईमध्ये झालेला सामना तिलकने स्वबळावर भारताला जिंकावला होता. तिलक वेळप्रसंगी गोलंदाजीदेखील करू शकतो ही त्याच्यासाठी जमेची बाजू ठरते.  

येत्या काळात या तिन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर भारतीय संघाची कामगिरी अवलंबून राहील. अभिषेक, वरूण आणि तिलक वर्माची कामगिरी ही नक्कीच बघण्यायोग्य असेल.  


सम्बन्धित सामग्री