Wednesday, February 12, 2025 03:03:23 AM

Rohit Sharma opt out from the fifth Test
रोहित शर्माने घेतली पाचव्या कसोटीमधून माघार

रोहित शर्माने घेतली पाचव्या कसोटी सामन्यातून माघार

रोहित शर्माने घेतली पाचव्या कसोटीमधून माघार  


मुंबई : चौथ्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाच्या कामगिरीविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले. या पराभवामुळे भारताचं बॉर्डर गावस्कर करंडक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. त्याचसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी श्रीलंका संघाच्या विजयावर भारताचे भवितव्य अवलंबून आहे. 

या सर्व घडामोडींमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने पाचव्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. रोहित शर्माचं कसोटी क्रिकेटमधील प्रदर्शन हे 
निराशाजनक होतं. त्याने पन्नासचा आकडा मार्च 2024 मध्ये पार केलेला. त्याचसोबत त्याच्या कर्णधारपदाच्या शैलीवर देखील बरेचसे प्रश्न उपस्थित केले जात होते. रोहितची कर्णधारपदाची शैली एकदिवशीय आणि टी- 20 सामन्याकरिता योग्य आहे. असं माजी क्रिकेटपटूंचं तसेच क्रीडा विश्वातील तज्ज्ञांचं म्हणणं होतं. 

रोहितच्या अनुपस्थितीमुळे अनेक प्रश्नानं उधाण आलं आहे. सर्वात मोठा प्रश्न आहे की, रोहीत शर्माने माघार घेतली की त्याला संघातून वगळण्यात आलं आहे ? 
तसेच, रोहित शर्मा पुन्हा कसोटी क्रिकेट खेळताना दिसेल का ? हा देखील मोठा प्रश्न आहे. 2024 मध्ये रोहित शर्मानं भारताला टी २० वर्ल्ड कप जिंकावल्यानंतर त्याने टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 

भारत सध्या 2-1 च्या फरकाने मालिकेत पिछाडीवर आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह कर्णधारपदाचा भार सांभाळेल. बॉर्डर - गावस्कर करंडकाच्या पहिल्या सामन्यात बुमराहने भारताचे कर्णधारपद सांभाळले होते आणि भारत त्या सामन्यात विजयी देखील झाला होता.


सम्बन्धित सामग्री