Tuesday, November 18, 2025 10:32:07 PM

Womens World Cup Final: दीप्तीला चुकीचे आऊट दिल्यावर रोहित शर्माचा राग अनावर; सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ

यावेळी भारताचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा स्वतः सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजर होता. त्याच्याच डोळ्यांसमोर पंचाकडून झालेल्या चुकीच्या निर्णयामुळे त्याने नाराजी व्यक्त केली.

womens world cup final दीप्तीला चुकीचे आऊट दिल्यावर रोहित शर्माचा राग अनावर सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ

Womens World Cup Final : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एक प्रसंग असा घडला, ज्यामुळे स्टेडियममधील सर्वच प्रेक्षकांचे लक्ष क्षणभर त्या दिशेने वळले. यावेळी भारताचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा स्वतः सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजर होता. त्याच्याच डोळ्यांसमोर पंचाकडून झालेल्या चुकीच्या निर्णयामुळे त्याने नाराजी व्यक्त केली.

पंचाच्या चुकीच्या निर्णयावर रोहितचा संताप  

दरम्यान, 37व्या षटकात भारताची स्टार ऑलराऊंडर दीप्ती शर्मा फलंदाजी करत होती. दक्षिण आफ्रिकेच्या नादीने डी क्लार्क हिने चेंडू टाकला आणि दीप्तीने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटऐवजी थेट तिच्या पॅडवर लागला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले आणि पंचाने क्षणाचाही विलंब न लावता दीप्तीला एलबीडब्ल्यू आऊट दिले. दीप्तीला आपल्यावरील निर्णय योग्य नसल्याची खात्री असल्याने तिने तात्काळ रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये चेंडू स्टम्पपासून दूर जात असल्याचे स्पष्ट झाल्यावर निर्णय बदलण्यात आला आणि ती नाबाद ठरली.

हेही वाचा - Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरचा ऐतिहासिक पराक्रम! बेलिंडा क्लार्कचा विक्रम मोडून स्थापन केला नवा विश्वविक्रम

कॅमेऱ्यात कैद झाले रोहितचे रिअॅक्शन

या घटनेदरम्यान रोहित शर्माच्या चेहऱ्यावरील राग कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसला. पंचाचा निर्णय चुकीचा ठरल्याचे दिसताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. त्याने टाळ्या वाजवत दीप्तीच्या पुनरागमनाचं स्वागत केलं. रोहितच्या या रिऍक्शनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

हेही वाचा - IND-W vs SA-W Final: भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचे लक्ष्य; शेफाली आणि दीप्तीने झळकावले अर्धशतक

भारताची दमदार फलंदाजी

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 298 धावा केल्या. स्मृती मंधानाने 45 धावा तर शेफाली वर्माने केवळ 78 चेंडूत 87 धावा करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली.
 


सम्बन्धित सामग्री