Friday, March 21, 2025 08:20:55 AM

'अभी हम कोई रिटायर…!' CT 2025 विजयानंतरचा व्हिडिओ व्हायरल

विजयानंतर रोहित आणि विराट भावूक होत आनंद साजरा करत होते. त्यांनी मैदानावर दांडिया खेळून चाहत्यांची मने जिंकली. पण त्याच वेळी कॅमेऱ्यांनी टिपलेला त्यांचा एक संवाद सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे.

अभी हम कोई रिटायर… ct 2025 विजयानंतरचा व्हिडिओ व्हायरल

भारतानं 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये न्यूझीलंडवर मिळवलेल्या चार विकेट्सच्या थरारक विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या संवादाने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधले.

विजयानंतर रोहित आणि विराट भावूक होत आनंद साजरा करत होते. त्यांनी मैदानावर दांडिया खेळून चाहत्यांची मने जिंकली. पण त्याच वेळी कॅमेऱ्यांनी टिपलेला त्यांचा एक संवाद सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. ICC च्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये रोहित विराटला म्हणतो, 'अभी हम कोई रिटायर नहीं हो रहे…!' हे ऐकताच विराट मोठ्याने हसू लागतो.

हेही वाचा: ICC Champions Trophy Prize Money: 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर टीम इंडियाला किती बक्षीस रक्कम मिळणार? जाणून घ्या

स्पर्धेपूर्वी रोहित आणि विराटच्या निवृत्तीबाबत अनेक चर्चा झडत होत्या. हा त्यांचा शेवटचा मोठा आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल का, यावर तर्कवितर्क रंगले होते. मात्र, रोहितच्या या वक्तव्याने चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय संघाचे हे दोन दिग्गज खेळाडू भविष्यातही मैदानावर दमदार कामगिरी करताना दिसतील, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे.

या विजयामुळे भारतीय संघानं ICC ट्रॉफीवरील आपली पकड आणखी मजबूत केली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर रोहित-विराटच्या या मैत्रीपूर्ण संवादाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू केली आहे. 


सम्बन्धित सामग्री