Thursday, March 12, 2026 09:55:03 PM

T20 World Cup 2026: साहिबजादा फरहानच्या शतकाने रचला इतिहास; विश्वचषकाच्या 18 वर्षांच्या प्रवासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कार

फरहानने अवघ्या 57 चेंडूत नाबाद 100 धावांची तुफानी खेळी साकारली. विशेष म्हणजे, हे केवळ वैयक्तिक यश नसून या शतकामुळे विश्वचषकाच्या इतिहासातील एक मोठा जागतिक विक्रम मोडीत निघाला आहे.

t20 world cup 2026 साहिबजादा फरहानच्या शतकाने रचला इतिहास विश्वचषकाच्या 18 वर्षांच्या प्रवासात पहिल्यांदाच घडला हा चमत्कार

T20 World Cup 2026:  T20 विश्वचषक 2026 च्या रणांगणात पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने नामिबियाविरुद्ध वादळी शतक झळकावून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. फरहानने अवघ्या 57 चेंडूत नाबाद 100 धावांची तुफानी खेळी साकारली. विशेष म्हणजे, हे केवळ वैयक्तिक यश नसून या शतकामुळे विश्वचषकाच्या इतिहासातील एक मोठा जागतिक विक्रम मोडीत निघाला आहे. एकाच स्पर्धेत सर्वाधिक शतके होण्याचा मान आता या हंगामाला मिळाला आहे.

एकाच हंगामात 3 शतकांचा अभूतपूर्व विक्रम
T20 विश्वचषकाच्या 18 वर्षांच्या इतिहासात आजवर कधीही एकाच स्पर्धेत 3 शतके पाहायला मिळाली नव्हती. साहिबजादा फरहानच्या या खेळीमुळे 2026 च्या विश्वचषकाने हा दुष्काळ संपवला आहे. याआधी एकाच पर्वात जास्तीत जास्त 2 शतके झाली होती. यंदाच्या स्पर्धेत युवराज सामराने 110 धावा, पाथुम निस्संकाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 100 धावा आणि आता साहिबजादा फरहानने नाबाद 100 धावा करत हा ऐतिहासिक आकडा गाठला आहे.

हेही वाचा - IND vs NED: भारत आणि नेदरलँड्समध्ये लढत; सूर्यकुमार यादवने जिंकली नाणेफेक, प्रथम फलंदाजीचा निर्णय

विश्वचषकातील शतकवीरांची आकडेवारी
या विक्रमी कामगिरीसोबतच विश्वचषकातील इतर काही महत्त्वाच्या नोंदींची चर्चा रंगली आहे. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल हा एकमेव फलंदाज आहे ज्याने टी-20 विश्वचषकात दोन शतके (2007 आणि 2016) ठोकली आहेत. भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर, 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 101 धावा करणारा सुरेश रैना हा भारताचा आतापर्यंतचा एकमेव शतकवीर ठरला आहे. दरम्यान, विश्वचषकातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम अजूनही न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्कलमच्या (123 धावा, 2012) नावावर अबाधित आहे. 
 


सम्बन्धित सामग्री