नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये अनेक असे फलंदाज आहेत ज्यांनी ओव्हरच्या ६ चेंडूत ६ षटकार मारलेत. हा विक्रम अनेकदा झाला असला तरी जो फलंदाज अशी कामगिरी करतो त्याची चर्चा होते. दिल्ली प्रिमीयर लीग टी-२० स्पर्धेत प्रियांश आर्याने धमाकेदार फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले. प्रियांशने एका ओव्हरमध्ये ६ षटकार मारण्याची कमाल केली. अरुण जेटली स्टेडियमवर साउथ दिल्ली सुपरस्टार्ज विरुद्ध नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स यांच्यात लढत झाली. साउथ दिल्ली सुपरस्टार्जकडून खेळणाऱ्या प्रियांशने सलामीला येत वादळी फलंदाजी केली. त्याने मनन भारद्वाजच्या ओव्हरमध्ये ६ षटकार मारले.
२३ वर्षीय प्रियांशने त्याच्या शतकी खेळीत १० चौकार आणि १० षटकार मारले. या लीगमधील हे त्याचे दुसरे शतक आहे. याआधी पुरानी दिल्ली ६ के विरुद्ध २६ ऑगस्ट रोजी झालेल्या लढतीत त्याने शतकी खेळी केली होती. या लढतीत प्रथम फलंदाजी करताना साउथ दिल्ली सुपरस्टार्जने ५ बाद ३०८ धावांचा डोंगर उभा केला. साउथ दिल्लीकडून प्रियांशुसोबत आयुष बडोनीने १६५ धावांची खेळी केली. त्याने ५५ चेंडूत ८ चौकार आणि १९ षटकार मारले. कर्णधार बडोनी आणि प्रियांश यांनी दुसऱ्या विकेटसाठी २८६ धावांची भागिदारी केली.
महत्त्वाचे मुद्दे -
- एका ओव्हरमध्ये ६ षटकारांची कमाल
- प्रियांश आर्याने झळकावले वादळी शतक
- फक्त इतक्या चेंडूत केल्या १०० धावा