भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट सामना चांगलाच रंगला. या सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवला आहे. दीप्ती शर्माने दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वोल्वार्ड्ट हीला अमनजोतच्या हाती कॅच आऊट केलं. लॉराने दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक 101 रन्स केल्या. दिप्ती शर्माने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला बॅकफुटवर ढकललं.
पावसामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना सुरु होण्यास मोठ्या प्रमाणात विलंब लागला. यावेळी झालेल्या टॉसमध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी निवडली. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर उत्तम कामगिरी करत 299 धावांचे आव्हान ठेवले. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या जेतेपदाच्या लढतीत भारताने 298 धावा केल्या. लॉरा वोल्पर्टने शतक झळकावून दक्षिण आफ्रिकेच्या आशा जिवंत ठेवल्या. तिने 101 धावा केल्या.
महिला विश्वचषक 1973 मध्ये सुरू झाला, परंतु भारतीय संघाला कधीही विश्वविजेतेपद मिळवता आले नव्हते. अखेर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला आहे. टीम इंडियाने यापूर्वी 2005 आणि 2019 मध्ये अंतिम सामना खेळला होता, परंतु 2025 हे वर्ष भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे.
महिला एकदिवसीय क्रिकेटला शेवटचे 2000 मध्ये नवीन विजेता मिळाला होता, जेव्हा न्यूझीलंड विजेता बनला होता.त्याआधी आणि नंतर, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे चॅम्पियन राहिले आहेत. आता, 25 वर्षांनंतर, महिला एकदिवसीय क्रिकेटला भारतात एक नवीन चॅम्पियन मिळाला आहे.