Friday, March 13, 2026 11:35:42 PM

IND A vs BAN A : ‘चॅम्पियन’चा किताब पुन्हा टीम इंडियाच्या नावावर! बांगलादेशविरुद्ध भारतीय लेकींचा दमदार विजय

बँकॉक येथील टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडवर भारतीय अ संघ विरुद्ध बांगलादेशचा अ संघ यांच्यातील महिला आशिया कप रायझिंग स्टार 2025 स्पर्धेचा अंतिम सामना  पार पडला.

ind a vs ban a  ‘चॅम्पियन’चा किताब पुन्हा टीम इंडियाच्या नावावर बांगलादेशविरुद्ध भारतीय लेकींचा दमदार विजय

बँकॉक येथील टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडवर भारतीय अ संघ विरुद्ध बांगलादेशचा अ संघ यांच्यातील महिला आशिया कप रायझिंग स्टार 2025 स्पर्धेचा अंतिम सामना  पार पडला. यावेळी भारतीय अ संघाने 46 धावांनी बांगलादेशला नमवत दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारताने बांगलादेशसमोर 135 धावांचे लक्ष्य ठेवले असता, बांग्लादेश अवघ्या 88 धावांवर पुर्णबाद झाला. यावेळी भारताकडून वृंदा दिनेश आणि नंदिनी कश्यप यांनी सुरुवात करत 30 धावांची भागीदारी रचली.

हेही वाचा- Sangli Crime : सांगलीत निर्दयी आईनेचा पैशांसाठी कारनामा; दत्तक देण्याचा बहाणा करत पोटची दोन पोरं विकली

तसेच तेजल हसबनीस हिने 34 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 51 धावांची एकमेव अर्धशतकी खेळी केली. त्याचसोबत कर्णधार राधा यादव हिनेही 30 चेंडूत 36 धावांचे तर वृंदा दिनेश हिने 17 चेंडूत 19 धावा करत संघाला महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारताकडून गोलंदाजीत प्रेरणा रावत हिने सर्वाधिक 12 धावांत 3 विकेट्स घेतल्या. तर दुसरीकडे बांगलादेशची सुरुवातच ढेपाळली. बांगलादेशकडून इश्मा तंजीम पहिली बाद झाली, जिला 5 चेंडूत 3 धावा करता आल्या. बांगलादेशकडून शमीमा सुल्ताना हिने 16 चेंडूत 20 धावा केल्या, तर सरमिन सुल्ताना हिने 29 चेंडूत 18 धावांचे योगदान दिले. बांगलादेश संघातील कोणतीही फलंदाज मोठी खेळी करू शकली नाही. 2023 नंतर भारताने दुसऱ्यांदा आशिया कप रायझिंग स्टार्सचा किताब पटकावला. विशेष म्हणजे, 2023 मध्येही त्यांनी बांगलादेशचा पराभव करून ही ट्रॉफी जिंकली होती.
 


सम्बन्धित सामग्री