Monday, June 23, 2025 12:17:59 PM

रिंकूने बोटात अंगठी घालताच खासदार प्रिया सरोजच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू, पहा हृदयस्पर्शी क्षण

रिंकूने अंगठी घालताच प्रियाच्या सरोजच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. प्रियाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.

रिंकूने बोटात अंगठी घालताच खासदार प्रिया सरोजच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू पहा हृदयस्पर्शी क्षण
Rinku Priya Saroj Engagement
Edited Image,X

लखनऊ: टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंगने आयुष्याची नवी इनिंग सुरू करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. रिंकू आणि खासदार प्रिया सरोज यांनी लखनऊमध्ये मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला आहे. त्यांच्या साखरपुड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिंकूने अंगठी घालताच प्रियाच्या सरोजच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. प्रियाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. रिंकू-प्रियाच्या साखरपुड्याला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, डिंपल यादव, जया बच्चन, इकरा हसन, राम गोपाल यादव आणि इतर अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती. 

प्रिया सरोज झाली भावूक - 

भारतीय संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंगने तरुण खासदार प्रिया सरोजशी साखरपुडा केला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये, रिंकूने प्रियाला अंगठी घालताच ती भावुक झाली. प्रियाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. त्यानंतर रिंकूने प्रियाचा हात हातात घेऊन आनंद व्यक्त केला. रिंकू आणि प्रिया या वर्षी 18 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. या खास प्रसंगी रिंकू आणि प्रियाला आशीर्वाद देण्यासाठी राजकारणातील अनेक दिग्गज मंडळी पोहोचली.

हेही वाचा -  Kuldeep Yadav Engagement: क्रिकेटपटू कुलदीप यादवचा साखरपुडा संपन्न; कोण आहे त्याची होणारी पत्नी? जाणून घ्या

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये रिंकूने अतिशय सुंदर शेरवानी परिधान केल्याचं दिसत आहे. त्याच वेळी प्रियाने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला आहे. एका फोटोमध्ये रिंकू प्रियाचा हात धरून स्टेजवर घेऊन जाताना दिसत आहे. क्रिकेटपासून राजकारणापर्यंत अनेक मोठ्या व्यक्ती रिंकूच्या साखरपुडा समारंभात पोहोचल्या होत्या. रिंकू आणि प्रिया गेल्या एक वर्षापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. या दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडने करून दिली होती.

हेही वाचा -  ठरलं तर मग! क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोज अडकणार लग्नबंधनात

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या, ज्याला नंतर प्रियाच्या वडिलांनी दुजोरा दिला. प्रिया गेल्या वर्षीच खासदार झाली. ती जौनपूरच्या मच्छलीशहर लोकसभा मतदारसंघाची खासदार आहे. 
 


सम्बन्धित सामग्री