Friday, March 13, 2026 09:52:39 PM

Tendulkar Family Meet PM : तेंडुलकर कुटुंबाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मुलगा अर्जुनच्या लग्नाचं दिलं खास निमंत्रण

सचिनने स्वतः सोशल मीडियाद्वारे या भेटीची माहिती शेअर केली असून, यावेळी संपूर्ण तेंडुलकर कुटुंब उपस्थित होते.

tendulkar family meet pm  तेंडुलकर कुटुंबाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट मुलगा अर्जुनच्या लग्नाचं दिलं खास निमंत्रण

Tendulkar Family Meet PM: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबाने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या खास भेटीदरम्यान तेंडुलकरने आपला मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या विवाहाचे निमंत्रण पंतप्रधानांना दिले. सचिनने स्वतः सोशल मीडियाद्वारे या भेटीची माहिती शेअर केली असून, यावेळी संपूर्ण तेंडुलकर कुटुंब उपस्थित होते. पंतप्रधानांनी या भावी जोडप्याला आशीर्वाद देत काही मोलाचा सल्लाही दिला.

पुढील महिन्यात रंगणार शाही विवाह सोहळा
अर्जुन आणि सानिया यांचा विवाह पुढील महिन्यात, म्हणजेच मार्च 2026 मध्ये पार पडणार आहे. विविध अहवालांनुसार, हा विवाह सोहळा 5 मार्च रोजी होण्याची दाट शक्यता आहे. अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी, 3 ते 5 मार्च दरम्यान लग्नाचे विधी पार पडतील असे मानले जात आहे. पंतप्रधान मोदींना प्रत्यक्ष भेटून आमंत्रण दिल्यामुळे आता लग्नाच्या तयारीला वेग आल्याचे स्पष्ट झाले आहे.

सचिन तेंडुलकरची खास पोस्ट
या भेटीचे फोटो शेअर करताना सचिन तेंडुलकरने लिहिले आहे की, "अर्जुन आणि सानियाच्या लग्नासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मोदीजी, या तरुण जोडप्याला आपण दिलेले आशीर्वाद आणि मार्गदर्शक सल्ल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद." सचिनच्या या पोस्टवर क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा - T20 World Cup: भारतीय खेळाडूंना कुटुंबापासून दूर राहावं लागणार! बीसीसीआयने टीम इंडियाची 'ती' मागणी फेटाळली

कोण आहे तेंडुलकर कुटुंबाची होणारी सून सानिया चांडोक?
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी सानिया चांडोक ही एका उच्चभ्रू व्यावसायिक कुटुंबातील आहे. ती मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात असून, त्यांच्या मालकीची मुंबईत अनेक मोठी हॉटेल्स आहेत. सानिया स्वतः देखील एक यशस्वी व्यावसायिक महिला आहे. ती मुंबईत "Mr. Paws" नावाचा एक आलिशान पेट स्पा आणि स्टोअर चालवते. अर्जुन तेंडुलकर सध्या क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून आपले करिअर घडवत असताना, आता सानियाच्या रूपाने तेंडुलकर कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होणार आहे.


सम्बन्धित सामग्री