मुंबई: विराट कोहलीच्या रणजी पुनरागमनाची उत्सुकता सर्व क्रिकेट चाहत्यांना होती. विराट कोहली शतक ठोकेल ? विराट कोहली द्विशत ठोकेल की विराट कोहली गोलंदाजी करेल ? यागोष्टींसाठी सर्व चाहते उत्सुक होते. मात्र, चाहत्यांचा हाती आली ती फक्त निराशा.
दिल्ली विरुद्ध रेल्वे हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट ग्राऊंडवर आयोजित केला गेला. सर्व सामान्यपणे रणजी सामन्याला 100 प्रेक्षकही नसतात, परंतु या सामन्यासाठी 17 हजारहुन अधिक प्रेक्षक आले होते. सर्वाना एकच अपेक्षा होती, की विराट कोहली काही तरी चमत्कार करेल. मात्र, तसे काही घडताना दिसलं नाही. दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 241 च्या धावसंख्येवर रेल्वे संघाला सर्वबाददेखील केले.
दिल्ली संघाची फलंदाजी आली दिल्ली सुरवात सर्वसाधारण झाली. 25व्या ओव्हरमध्ये विराट कोहलीची फलंदाजी आली. विराट कोहलीचे आगमन होताच मैदान जल्लोष सुरु झाला. विराट कोहलीने सावधगिरी बाळगत डावाची सुरवात केली. 14व्या चेंडूवर विराट कोहलीने वेगवान गोलंदाज हिमांशू सागवानला पुढे येऊन स्ट्रेट ड्राईव्हवर चौकार खेचला. चौकारानंतर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाड ऐकू आला. मात्र पुढच्याच चेंडूवर विराट त्रिफळाचित झाला. विराट कोहली गुड लेंथ टप्प्यावरचा चेंडू पुढे खेळण्याच्या प्रयत्नांना बाद झाला.
कोहली बाद होताच मैदानात शुकशुकाट पसरला. थोड्याच क्षणात तुडुंब भरलेलं कोटला मैदान खाली व्हायला लागलं. प्रेक्षकांनी कोहली बाद होताच मैदान सोडलं. हा सामना दिल्ली संघाने 1 डाव आणि 19 धावांनी जिंकला. त्यामुळे कोहलीची दुसऱ्या डावात फलंदाजीदेखील आली नाही. आता विराट कोहली पुन्हा कधी रणजी सामना किंवा डोमेस्टिक क्रिकेटचा सामना खेळेल यावर सर्वांचा लक्ष राहील. विराट कोहलीच्या येण्याने रणजी करंडक बघायला प्रेक्षक मोठ्या संख्येने हीच एक सुखाची बाब ठरली.