Wednesday, December 11, 2024 12:58:58 PM

Cricket
खेळताना क्रिकेटपटूचा मृत्यू

सिडको गरवारे मैदानावर बुधवारी संध्याकाळी एका सामन्यादरम्यान शहरातील क्रिकेटपटू उद्योजक इमरान पटेल यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

खेळताना क्रिकेटपटूचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : सिडको गरवारे मैदानावर बुधवारी संध्याकाळी एका सामन्यादरम्यान शहरातील क्रिकेटपटू उद्योजक इमरान पटेल यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ते 35 वर्षांचे होते. इमरान पटेल यांच्या मागे त्यांची आई, पत्नी, तीन मुली आणि चार भाऊ असा परिवार आहे.

खेळत असताना छातीत वेदना होऊ लागल्यामुळे इमरान पटेल यांनी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. मैदानावरुन बाहेर पडत असताना आणखी त्रास होऊ लागला आणि ते मैदानातच कोसळले. इमरान यांची तब्येत ढासळली ते मैदानात पडले. हा प्रकार बघून मैदानातील खेळाडूंनी धावत जाऊन इमरान यांना उचलले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन इमरान यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

याआधी यंग इलेव्हन विरुद्ध लकी बिल्डर या सामन्यात लकी बिल्डरचे मालक आणि प्रमुख खेळाडू असलेल्या इमरान पटेल यांनी सतरा चेंडूत बावीस धावा केल्या होत्या. खेळत असताना एक चौकार मारल्यानंतर इमरान पटेल यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. वेदना वाढू लागल्यामुळे इमरान पटेल यांनी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. मैदान सोडत असतानाच तब्येत ढासळली आणि ते खाली कोसळले. थोड्या वेळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


सम्बन्धित सामग्री





jaimaharashtranews-logo