Sun. Jun 20th, 2021

‘तुम्हाला वटवाघळं खाण्याची, त्यांचं रक्त, लघवी पिण्याची काय गरज आहे?’

कोरोना व्हायरस जगभरात पसरवल्याबद्दल जगभरातून चीनविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनामुळे जगभरात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. कौटुंबिक सणसमारंभांपासून ते टोकयो ऑलिम्पिकही रद्द होऊ लागल्या आहेत. या जागतिक महामारीबद्दल इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन याने चीनला दोषी ठरवत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

पीटरसनने चीनमधील एक व्हिडिओ शेअर करत चीनवर हल्लाबोल केला आहे. या व्हिडिओमध्ये जिवंत कुत्रा शिजवत असल्याचं दिसत आहे. यासंदर्भात पीटरसनने लिहिलं आहे, की जगभरात लॉकडाऊन आहे, आणि चीनमध्ये बाजारात जिवंत कुत्रा उकळत्या पाण्यात शिजवताना दिसत आहे. यापूर्वीही त्याने कोरोनासंदर्भात चीनवर टीका केली होती. कोरोना कुठून सुरू झाला? चीनमधील वुहानच्या घाणेरड्या बाजारत जिवंत आणि मेलेले प्राणी विकले जातात.  

पीटरसनपूर्वी पाकिस्तानी फास्ट बॉलर शोएब अख्तर यानेदेखील चीनवर यापूर्वी हल्लाबोल केला होता. जगभरात आज निर्माण झालेल्या परिस्थितीला चीनच जबाबदार असल्याचं त्याने म्हटलं आहे. तसंच युट्युबवर यासंदर्भातला व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे.

’तुम्हाला वटवाघळं खाण्याची, त्यांचं रक्त, लघवी पिण्याची काय गरज आहे?’ असा सवाल त्याने केला आहे. यामुळेच जगभरात कोरोनासारखा विषाणू जगभरात पसरल्याचा आरोप अख्तरने केला आहे. लोक वटवाघळं, कुत्रे, मांजरी कसं काय खाऊ शकतात? असा सवाल त्याने केला आहे. आपल्याला चीनी लोकांचा राग नाही. मात्र त्यांच्या जीवनशैलीबद्दल आक्षेप असल्याचं त्याने म्हटलं. विशेष म्हणजे हा व्हिडिओ युट्युबवर टाकल्यानंतर काही काळातच त्याने तो काढून टाकला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *