Mon. Aug 8th, 2022

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एसटी बसेसवर डेटॉलचा मारा

कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. चीनमधून आलेल्या या वायरसने राज्यातही शिरकाव केला आहे. यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर सरकार कोरोनाविरोधात लढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. कोरोना विषाणूच्या देशातील पादुर्भावामुळे टुर्स-ट्रॅव्हल्सच्या मालकांनी प्रवासी बसमध्ये प्रवास करणाऱ्यांना निर्जंतुकीकरणाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, तसेच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांबाबत प्रशासनाला वेळीच माहिती द्यावी.

तसेच दक्षतेसंबंधी शासनाने जारी केलेल्या प्रत्येक बाबींचे पालन व्हावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिली होती.

यानंतर अमरावती जिल्ह्यातील बस आगारात कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रत्येक बसेस आतून सॅनीटाईझ केल्या जात आहे.

विशेष करून येणार्‍या प्रत्येक प्रवाशाला अधिकारी व कर्मचारी आवर्जून हॅड सॅनीटाईझर देऊन जंतु मुक्त करणे सुरु झाले आहे. तसेच प्रवाशांची गर्दी होणार नाही याची काळजीही आगारामध्ये घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.