Thu. Jan 27th, 2022

स्पृहा जोशीच्या ‘त्या’ पोस्टला वेगळं वळण…

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज कलाकार राजकरणात प्रवेश करत आहेत. यामध्ये अभिनेत्री कलाकारांचा जास्त समावेश आहे. सध्या अनेक दिग्गज अभिनेत्रींनी राजकारणात प्रवेश केला आहे. मिमी चक्रवर्ती, नुसरत जहॉं, जया प्रदा आणि उर्मिला मातोंडकर यासारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे. तसेच यांच्या प्रवेशामुळे त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली जात आहे. मात्र मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीने फेसबुकवर पोस्ट करून याबाबतीत चांगलाच समाचार घेतला आहे.

नेमकं या पोस्टमध्ये आहे काय ?

सिनेसृष्टीतल्या कलाकाराने राजकारणामध्ये प्रवेश करणे, कुठल्याच पक्षामध्ये नवीन नाही.

यंदा निवडणुकांच्या काळात एकमेकांना टक्कर देण्यासाठी नवनवीन चेहरे राजकीय रिंगणामध्ये उतरले आहेत.

यामध्ये अनेक सिनेसृष्टीतील कलाकारांनी सुद्धा प्रवेश केला.

यामध्ये पुरूष किंवा स्त्री कलाकार असोत, यामध्ये फक्त स्त्री कलाकरांच्या प्रवेशावरच जास्त बोलंलं गेलं.

मात्र या प्रतिक्रिया वैयक्तिक पातळीवरच्या आणि फक्त स्त्री अभिनेत्री असल्यामुळे जास्त बोललं गेल्याचे मत

अभिनेत्री स्पृहा जोशीने एक पोस्ट तिच्या फेसबुक अकांऊटवर शेअर केली आहे.

मात्र तिच्या या पोस्टमुळे लोकांनी तिला काही प्रश्न उपस्थित केले आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर जेव्हा टीका केली तेव्हा तू का बोलली नाहीस? असे प्रश्न उपस्थित केले.

आता उर्मिला मातोंडकर मराठी असल्यामुळे तू बोलते आहेस का ? असे कमेंटही करण्यात आले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *