स्पुटनिक भारतात आली हो !

रशियाची स्पुटनिक व्हीची लस भारतात दाखल झाली आहे. १,५०,००० डोसची पहिली खेप मॉस्कोहून हैदराबादला पोहोचली आहे. या महिन्यात रशियन लसीचे आणखी तीन दशलक्ष डोस येणार आहेत.

डॉ. रेड्डी यांच्या प्रयोगशाळांना या लसी दिल्या जातील, ज्यांनी भारतात स्पुटनिक व्ही तयार करण्यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड सोबत हातमिळवणी केली आहे.

१ एप्रिलला डीसीजीआयने स्पुटनिक व्ही लस वापरण्यास मान्यता दिली. स्पुटनिक व्हीला मान्यता देणारा भारत ६० वा देश बनला आहे. भारतात पाच ठिकाणी स्पुटनिकचं उत्पादन होणार आहे.

Exit mobile version