Sun. Oct 17th, 2021

स्पुटनिक लस पुढील आठवड्यात दाखल होणार

देशामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर विनोद कुमार पॉल यांनी लसीकरणासाठी लवकरच भारताकडे पुरेश्या प्रमाणात लशी उपलब्ध असतील असं म्हटलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान २१७ कोटी लशी लसीकरणासाठी उपलब्ध असतील. २०२२ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत ३०० कोटी डोस उपलब्ध असतील असं पॉल यांनी म्हटलं आहे.

‘हे पूर्ण होणार नाही असंही म्हटलं जाईल. पण या संदर्भातील सर्व तयारी सुरु करण्यात आली आहे’, असं पॉल यांनी सांगितलं. देशातील लसीकरणाच्या तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकारचा टास्क फोर्सच्या मदतीने जास्तीत जास्त लशी भारतात आणण्याचा प्रयत्न आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्याची सरकारची योजना तयार केल्याचे संकेत पॉल यांनी दिलेत.

‘पुढील आठवड्यापर्यंत स्पुटनिक व्ही बाजारामध्ये उपलब्ध असेल.पुढील आठवड्यापासून रशियाकडून मिळालेल्या या लसींची विक्री करण्यात येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे’, असं पॉल यांनी सांगितलं.

स्पुटनिक लस पुढील आठवड्यात भारतात दाखल होणार असून या लसीचा दर निश्चित करण्यात आला आहे.भारतात स्पुटनिक लसीची किंमत ९९५.४५ पैसे इतकी असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *