Fri. Jan 21st, 2022

‘स्पूतनिक पाच’ लस देण्यास आजपासून सुरुवात

मुंबई : मुंबईतील वोक्हार्ट खाजगी हॉस्पिटलमध्ये आजपासून स्पूतनिक V लस देण्यास सुरुवात झाली आहे. अनेक नागरिक स्पूतनिक V या लसीच्याच प्रतीक्षेत होते त्यांना अखेर आज ही लस घेता आली. विशेष म्हणजे या लसीच्या दोन डोसमधील अंतर हे केवळ २१ दिवसांचं आहे. २ महिन्यांपूर्वीच स्पूतनिक Vसाठी नागरिकांनी नोंदणी केली होती. त्यांना आज लस घेता आली. स्पूतनिक Vच्या दोन्ही डोसची किंमत २ हजार २९० रुपये आहे. ज्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *