Thu. Sep 29th, 2022

#SriLanka : साखळी बॉम्बस्फोटात 207 मृत्यूमुखी, 7 जणांना अटक

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये 8 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. 3 चर्च आणि 3 हॉटेलमध्ये हे स्फोट झाले. ईस्टरच्या दिवशी चर्च आणि हॉटेलमध्ये हे बॉम्बस्फोट केल्यामुळे ख्रिश्चन समाजाला लक्ष्य केल्याची चर्चा आहे. या स्फोटातील मृतांचा आकडा आतापर्यंत 207 वर पोहोचला आहे.४०० हून अधिक जण या स्फोटात जखमी झाले आहेत.मृतांमध्ये 35 विदेशी पर्यटकांचा समावेश असल्याचंही सांगण्यात येत आहे. यानंतर श्रीलंका सरकारने संचारबंदीचे आदेश आहेत.तर फेसबुक सहीत सोशल माडीयावर बंदी घातली आहे.याप्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. परंतु अटक करण्यात आलेले हे 7 संशयित नॅशनल तौहिद जमातचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

7 संशयितांना अटक

कोलंबोमध्ये आज ईस्टर संडे होत असताना 3 चर्चसहीत 3 हॉटेलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले.

या बॉम्बस्फोटात 207 जणांचा मृत्यू झाला असून,400 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

यात 35 विदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याचही सांगण्यात येत आहे.

यानंतर श्रीलंका सरकारने संचारबंदीचे आदेश दिले असून सोशल माडीयावर बंदी घातली आहे.

याप्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

या हल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.

परंतु अटक करण्यात आलेले हे 7 संशयित नॅशनल तौहिद जमातचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.