Thu. Sep 29th, 2022

श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ईस्टरच्या दिवशी साखळी बॉम्बस्फोट झाले. ईस्टरच्या दिवशी 3 चर्च आणि 3 हॉटेलमध्ये एकापाठोपाठ हे बॉम्बस्फोट झाल्याने श्रीलंकेची राजधानी कोलंबो हादरली. या बॉम्बस्फोटात 290 जण ठार झाले असून 400 हून अधिक जखमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे.यामध्ये 35 विदेशी पर्यटकांचा समावेश आहे.याप्रकरणी श्रीलंका पोलिसांनी 24 संशयीत हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याची माहिती श्रीलंकन माध्यमांनी दिली. सोशल मीडियावरही बंदी घालण्यात आली होती. रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून आज पहाटे सहापर्यंत संचारबंदी करण्यात आली होती. तर श्रीलंकेचे राष्ट्रध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून ही आणीबाणी लागू होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

राष्ट्रध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी श्रीलंकेत आणीबाणी जाहीर केली आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून ही आणीबाणी लागू होणार आहे अशी माहीती आहे.

रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून आज पहाटे सहापर्यंत संचारबंदी करण्यात आली होती.

साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत सोशल मीडियावरही बंदी घालण्यात आली होती.

ईस्टरच्या दिवशी श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये एकापाठोपाठ बॉम्बस्फोट झाले.

यामध्ये 35 विदेशी पर्यटकांसह 290 जणांचा मृत्यू झाला असून 400 जण जखमी आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.