Thu. Sep 29th, 2022

#SriLanka : साखळी बॉम्बस्फोटमागे ही संघटना?

श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर आतापर्यंत 24 संशयीतांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या स्फोटामागे श्रीलंकेची कट्टरवादी संघटना नॅशनल तोहिद जमात असल्याचा संशय श्रीलंकन सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र अल कायदा, आयसीस सारख्या दहशतवादी संघटनाच्या मदतीशिवाय या तिव्रतेचे स्फोट घडवून आणणे कठीण असल्याचं तज्ञानी म्हटलं आहे. सर्वच्या सर्व सहा बॉम्बस्फोट हे आत्मघातकी स्वरुपाचे असल्याचं स्पष्ट झालं आहे.एकुण 7 जणांनी तीन चर्च, तीन फाईव स्टार हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवले.सातही सुसाईड बॉम्बर श्रीलंकेचे नागरीक असून एकाची ओळख पटली आहे.श्रींलकेत मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू होणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.

काय आहे नॅशनल तोहिद जमात?

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटामागे या संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

कट्टर वहाबी विचारधारा पसरवण्याचं काम ही संघटना करते

जागतिक जिहाद श्रीलंकेमध्ये पसरवण्याचा प्रयत्न या संघटनेतर्फे झाला आहे.

2016 मध्ये कोलंबोतील बुध्द मुर्ती तोडण्याचा सुद्धा प्रयत्न या संघटनेकडून झाला आहे.

या संघटनेच्या सचिव अब्दुल राझीक याला अटक करण्यात आलं आहे.

मुस्लीम- बौध्दाच्या हिंसाचारामध्ये या संघटनेचा हात आहे.

मुस्लीम-बौध्द हिसांचारानंतर या संघटनेचा प्रभाव श्रींलकेत काही ठिकाणी वाढला आहे.

श्रींलकेत मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू होणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.