Mon. Aug 8th, 2022

श्रीलंका बॉम्बस्फोट प्रकरणात 24 संशयीत ताब्यात

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ईस्टरच्या दिवशी आठ बॉम्बस्फोट झाल्यामुळे श्रीलंता हारदरली आहे. या बॉम्बस्फोटात 290 जण ठार झाले असून 400 हून अधिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हा बॉम्बस्फोट घडवून आणारे संशयीत हल्लेखोरांना ताब्यात घेतले असल्याचे माहिती श्रीलंकन माध्यमांनी दिली आहे. ईस्टरच्या दिवशी सहा साखळी बॉम्ब चर्च आणि हॉटेलमध्ये केल्यामुळे ख्रिश्चन समाजाला लक्ष्य केल्याचे समजते आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं ?

कोलंबोमध्ये ईस्टरच्या दिवशी आठ बॉम्बस्फोट झाले.

हा बॉम्बस्फोट रविवारी सकाळी 8.45 च्या दरम्यान घडला.

तीन फाईव्ह स्टार हॉटेल आणि तीन चर्चमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आला.

तर दुपारच्या सुमारास पुन्हा दोन बॉम्बस्फोट करण्यात आले.

या बॉम्बस्फोटात 290 जण ठार झाले असून 400हून अझिक जखमी झाले आहेत.

तसेच श्रीलंका पोलिसांनी 24 संशयीत हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याची माहिती श्रीलंकन माध्यमांनी दिली.

सोशल मीडियावरही बंदी घालण्यात आली होती.

रविवारी संध्याकाळी सहा वाजतापासून आज पहाटे सहापर्यंत संचारबंदी करण्यात आली होती.

यामध्ये 35 परदेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

तर यामध्ये 3 भारतीयांचा समावेश आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.