Wed. Dec 8th, 2021

आरोग्य सेवेतील २५००० कर्मचाऱ्यांना शाहरुखतर्फे PPE किट्सचं वाटप

कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. आधी २१ दिवस असणारा लॉकडाऊन आता ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. यावेळी गरीब जनतेला सर्वांनी मदत करावी, असं आवाहन केलंय. अनेक सेलिब्रिटींनी या आवाहनाला प्रतिसाद देत मोठी मदत केली आहे. अभिनेता शाहरूख खान यानेही पीएम फंडाला मदत केल्यानंतर आता आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार पीपीई किट्सचं वाटप केलं. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. अशा डॉक्टर, नर्सेस यांच्या सुरक्षेसाठी शाहरुखने ‘पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट’ चे २५००० किट्स वाटले.

या मदतीबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करून शाहरुखचे आभार मानले.

याला उत्तर देताना शाहरुखनेदेखील तुम्हाला मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे, असं म्हटलं आहे.

शाहरुख आणि गौरीने २ एप्रिल रोजी आपल्या कंपन्यांद्वारे सरकारला निधी पुरवला होता. कोलकाता नाईट रायडर, रेड चिलीज एंटरटेनमेंट, रेड चिलीज VFX तसंच मीर फाऊंडेशन तर्फे त्याने मदत केली. ५० हजार PPE किट्ससाठी सरकारला निधी दिला. मुंबईतील ५५०० कुटुंबांसहित १० हजार लोकांनी जेवणाचा खर्च शाहरुखतर्फे होत आहे. हॉस्पिटलमधील २००० जणांचं जेवण, ऍसिड हल्ल्यातील १०० पीडितांना किराणा सामानाची मदत तसंच दिल्लीतील २५०० रोजंदारी कामगारांनाही किराणा सामानाची मदतही शाहरूख करत आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *