मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते भारतीय स्टार्टअप कंपनीचा नवा स्मार्टफोन लाँच
वृत्तसंस्था, मुंबई
स्मार्टोन कंपनीने srt हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या फोनचे लाँचींग करण्यात आले.
भारतीय स्टार्टअप कंपनी loT ने या स्मार्टफोनच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरला एक अनोखी मानवंदना दिली आहे.
सचिन या स्मार्टफोनचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. srt स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत.
या फोनच्या 32 जीबी व्हेरिएंटची किंमत 12,999 रु. आहे. तर 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे.
शाओमीच्या रेडमी नोट 4 आणि मोटो G5 ला हा स्मार्टफोन टक्कर देणार आहे. या स्मार्टफोनसोबत 1500 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील आहे. तसेच सचिन तेंडुलकरच्या ब्रॅण्डचं बॅक
कव्हरही देणार आहे. अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या यूजर्सना 5 टक्के कॅशबॅकही मिळणार आहे.
srt स्मार्टफोनचे बेस्ट फीचर
– अँड्रॉईड 7.0 नगेट ओएस
– यामध्ये 5.5 इंच स्क्रिन असून याचं रेझ्युलेशन 1080×1920 पिक्सल आहे.
– 1.8GHz ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 652 SoC प्रोसेसर
– 4 जीबी रॅम
– 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
– रिअर पॅनलवर फिंगर सेंसर
– 3000 mAh क्षमतेची बॅटरी