Tue. Dec 7th, 2021

एसएससी पास तरुणांसाठी संरक्षण मंत्रालयामध्ये नोकरीची संधी

एसएससी पास असणाऱ्या आणि कामाच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गूड न्यूज आहे. भारताच्या संरक्षण मंत्रालयामध्ये अनेक पदासाठी भरती आहे.

यासाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 10 वी पास असणारे तरुण या पदांसाठी अर्ज करु शकतात.

संरक्षण मंत्रालय विभागामध्ये मजूर, चौकीदार आणि सिव्हिल मोटार ड्रायव्हर या पदासाठी ही पदभरती आहे. 18-30 या वयातील अर्जदाराच या पदभरतीसाठी अर्ज करु शकतात.

या पदभरतीसाठीची अर्जप्रक्रिया 31 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.

अर्ज करण्याची अखेरची तारीख 18 जानेवारी 2020 पर्यंत आहे.

ही तारीख ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्यासाठीची शेवटची तारीख आहे.

विशेष म्हणजे या परीक्षेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाहीत. या नोकरीसाठीचे मुंबई आणि पुणे हे ठिकाण असणार आहे.

शैक्षणिक पात्रता :

मजूर, चौकीदार आणि सिव्हिल मोटर ड्रायव्हर या तीन पदासाठी ही भरती आहे. या तीन्ही पदासाठी अर्ज करणारा अर्जदाराचं किमान शिक्षण 10 वी पास असायला हवं.

तर ‘सिव्हिल मोटर ड्रायव्हर’ या पदासाठी अर्ज करणाऱ्याकडे अवजड वाहन चालवण्याचा तीन वर्षांचा अनुभव असायला हवा.

ऑफिसर कमांडिंग, ७५२ ट्रान्स्पोर्ट कंपनी रॉस रोड, रेस कोर्स जवड, पुणे ४११००१. सदर पत्त्यावर अर्जदारांना आपला अर्ज सादर करायचा आहे.

पदभरतीच्या जाहिरातीसाठी क्लिक करा

वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *