Wed. Jan 26th, 2022

दहावीचा निकाल आज घोषित होणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी आठ माध्यमांतील ९ लाख ९ हजार ९३१ मुले तर ७ लाख ७८ हजार ६९३ मुली असे एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी प्रविष्ट होते. यामध्ये ५० गुण नववीच्या परीक्षेच्या आधारावर, ३० गुण सराव परीक्षा आणि २० गुण अंतर्गत मुल्यमापनावर आधारीत आहेत.विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे निकाल कसा लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

निकाल कुठे पाहाल?

http://result.mh-ssc.ac.in/
http: //result.mh-ssc.ac.in
mahahssc board.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *