Wed. Jun 19th, 2019

SSC चा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजी!

0Shares

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ७७.१० % लागलाय. शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केलाय.यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ८८.३८ % लागलाय. तर मुंबईचा निकाल ७७.४ % निकाल लागलाय. १७९४ शाळांचा निकाल १०० % लागलाय.

 

SSC चा निकाल

– पुणे ८२.४८

– नागपूर ६७.२७

– औरंगाबाद ७५.२०

– मुंबई ७७.४

– कोल्हापुर ८६.५८

– अमरावती ७१.९८

– नाशिक ७७.५८

– लातूर ७२.८७

– कोकण ८८.३८

या नऊ मंडळामार्फत दहावीच्या परीक्षा घेण्यात आले होत्या.  राज्यात १६ लाख ३९ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे, तर नागपूरचा निकाल सर्वांत कमी लागला आहे.

आज दहावीचा निकाल कसा पाहाल?

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: