Sun. May 16th, 2021

…याने दहावीत मिळवले 35 टक्के मार्क्स

काल दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबाला निकालाची आणि मिळणाऱ्या टक्केवारीची उत्सुकता होती. जास्तीत जास्त टक्केवारी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक असला तरी पालघर मधील उर्से येथील आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या गणेश लडे यांने मॅजिक फिगर ने टक्केवारी मिळवली आहे . गणेश प्रत्येक विषयात 35 टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाला आहे .

गणेश प्रत्येक विषयात टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण

गणेश डहाणूतील म्हसाड येथील रहिवाशी असून घरा शेजारी असलेल्या उर्से या आश्रमशाळेत तो शिक्षण घेत होता .

यानंतर दहावीचा रिझल्ट पाहुन गणेशच्या घरातले आणि त्याच्या  मित्रांकडून जँगी स्वागत करण्यात आलं .

 

मात्र गरजे इतकेच मार्क्स मिळवणाऱ्या आदिवासी कुटुंबातील जन्मलेल्या गणेशची सध्या परिसरात आणी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

गणेशला प्रत्येक विषयात 35 मार्क्स मिळाले आहेत. त्यामुळे त्याच्या निकालाची सर्वत्र चर्चा  होत आहे.

गणेश लडे हा आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेत  शिकतो.त्याने मॅजिक फिगर ने टक्केवारी मिळवली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *